King cobra viral video: जगात वेगवेगळे प्राणी वास्तव्य करतात. त्यांच्या अनेक निरनिराळ्या प्रजाती असतात ज्या विषारी आणि बिनविषारी आहेत. यातील काही खूपच धोकादायक असतात ज्यांच्या हल्ल्यात जीवही जाऊ शकतो. किंग कोब्रा. सर्पाच्या अनेक खतरनाक जातींपैकी आणखी एक सर्वाधिक विषारी आणि खतरनाक अशी प्रजाती. साधासुधा सापाला घाबरणारे तर किंग कोब्राला पाहून असेच बेशुद्ध पडतील. काहींना तर स्वप्नात जरी साप दिसला, तरी दचकून जाग येते. साप म्हटलं की भल्याभल्यांच्या अंगाला दरदरून घाम फुटतो. मात्र हाच कोब्रा एखाद्या ठिकाणी जाऊन असा लपून बसतो की आपल्याला कळतही नाही. अशाच एका किंग कोब्राचा व्हिडीओ सध्या समोर आला आहे. हा कोब्रा अशा ठिकाणी लपून बसला आहे की पाहून तुमचाही थरकाप उडेल.

अनेकवेळा साप लोकांच्या घरात घुसतात, अशा वेळी ते घरात राहणाऱ्या लोकांसाठी मोठा धोका निर्माण करतात. घरात साप दिसला की पायाखालची जमीन सरकते. रेफ्रिजरेटरच्या मागे ग्रीलमध्ये साप लपून बसल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे, सर्वात धोकादायक गोष्ट म्हणजे हा साप सामान्य साप नसून तो किंग कोब्रा आहे. ज्याचा एक दंश कोणाचाही क्षणार्धात जीव घेऊ शकतो. रेफ्रिजरेटरच्या मागे साप बसल्याचे घरातील लोकांना कळल्यावर त्यांनी रेस्क्यू टीमला बोलावले. त्यानंतर फ्रीज हलवला जातो आणि सापाला बाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू होते. यावेळी फ्रीजमधून सापाचे तोंड बाहेर येताच तो ताबडतोब चावायला फणा पसरवतो आणि चावण्याचा प्रयत्नही करतो.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Tanker accident shocking video goes viral on the internet truck and bike accident know in marathi
नशीबावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; टँकरला धडकला, समोर मरण दिसलं पण पुढच्याच क्षणी काय घडलं पाहा
One decision can change your life fish jumping in big ocean shocking video goes viral
जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! ‘या’ छोट्याश्या माशाचा VIDEO पाहून कळेल एका निर्णयानं संपूर्ण आयुष्य कसं बदलतं
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
do you know which fort is this
हा कोणता किल्ला आहे, तुम्ही ओळखू शकता का? Viral Video एकदा पाहाच
Shocking video You have never seen such a theft clothes theft caught on cctv goes viral
Shocking video: अशी चोरी तुम्ही आजपर्यंत पाहिली नसेल; अख्ख कुटुंब येतं उभं राहतं अन्…VIDEO पाहून आत्ताच सावध व्हा
Leopard attacks Viral Video
‘त्याने लढून स्वतःचा जीव वाचवला…’ घराबाहेरच्या अंगणात बिबट्याने थेट श्वानावर केला हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप

या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, कोब्राला पकडण्यासाठी रेस्क्यू टीमलाही खूप संघर्ष करावा लागत असल्याचे दिसत आहे. यादरम्यान तो कॅचरवर अनेक वेळा हल्लाही करतो. मात्र, शेवटी साप पिशवीत टाकला जातो. सध्या हा व्हिडिओ पाहून लोकांना घाम फुटला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: काळ आला होता पण वेळ आली नव्हती…नशीब बलवत्तर म्हणून ‘तो’ असा वाचला, थरकाप उडवणारा अपघात

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ‘भावा, प्लिज एवढी रीस्क घेऊ नको.’ तर अन्य एका नेटकऱ्याने म्हटलं, ‘हा काय वेडेपणा आहे?’. सापाच्या व्हिडीओला हजारो व्यूज मिळाले असून व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.

Story img Loader