King Cobra Viral video: सापाचं नुसतं नाव जरी काढलं तरी आपली भांबेरी उडते. जर साप खरचं तुमच्या समोर आला तर तुम्ही काय करणार ? तुम्ही नक्कीच घाबरुन जाल. एकीकडे लोक नुसतं सापाचं नाव जरी काढलं तर घाबरतात आणि दुसरीकडे काही लोक मात्र सापाला अजिबात घाबरत नाहीत. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एक महिला भला मोठा किंग कोब्रा साप पकडताना दिसत आहे. या महिलेने किंग कोब्रा सापाला आपल्या हातात घेतल्याचे पाहून नेटकरी देखील हैराण झाले आहेत.
सोशल मीडियाच्या दुनियेत व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये एक महिला हातात भलामोठा किंग कोब्रा साप पकडत असल्याचे दिसत आहे. महिलेनं साप पकडण्याचं कोणतं खास ट्रेनिंग घेतलं आहे असं तिच्याकडे बघून वाटत नाही मात्र अत्यंत सराईतपणे ही महिला सापाला पकडत आहे. तिच्याकडे बघून ती गृहीणी असल्याचं वाटत आहे. महिलेची साप पकडण्याची पद्धत पाहून अनेकजण हैराण झाले आहेत.तर काही जणांनी महिलेची साप पकडण्याची पद्धत धोकायदायक असल्याचे म्हटलं आहे. कोब्राचा दंश झाल्यावर जीव वाचण्याची शक्यता खूपच कमी असते. त्यामुळे या सापाच्या जवळ जाणं म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखंच आहे
पाहा व्हिडीओ
हेही वाचा – Viral video: एअर शो दरम्यान आग लागून विमान कोसळलं, जीव वाचवण्यासाठी लोकांनी उड्या मारल्या पण…
किंग कोब्राने दंश केल्यावर शरीरात मोठ्या प्रमाणात सापाचं विष पसरलं जातं. इतर सापांच्या तुलनेत किंग कोब्रा सापाचं वेनम अतिशय घातक असतं. त्यामुळे किंग कोब्रासह इतर सापांच्याही जवळ जाणे जीवघेणं ठरु शकतं. जंगलात फिरताना सापांपासून सावध राहा, सापांच्या जवळ जाऊ नका, अशा सूचना वन विभागाकडून नेहमीच दिल्या जातात. पण काही लोक नियमांचे उल्लंघन करतात आणि सापाची शिकार होतात.