गणेशोत्सव जवळ असताना, एक महिला जम्मू-काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील नियंत्रण रेषेजवळ (एलओसी) मंदिरात ठेवण्यासाठी ‘भारत-पाकिस्तान बॉर्डर चा राजा’ नावाची गणपतीची मूर्ती घेऊन जात आहे. गणेश चतुर्थी उत्सवासाठी मूर्ती मुंबईहून पुंछ येथे नेण्याची ही पहिली वेळ नाही. किरणबाला ईशर, ज्यांना ‘ईश्वर दीदी’ म्हणूनही ओळखले जाते, त्या गेली सहा वर्षे त्यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह नेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या बॅनरखाली हे काम करत आहेत. ईशर यांची स्वयंसेवी संस्था सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेसाठी पूचमध्ये गणपतीची मूर्ती बसवतात.
“माझी आणि माझ्या कुटुंबाची गणपती बाप्पावर विशेष श्रद्धा आहे. मी लष्करी पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबातून आले आहे, आणि गणपती बाप्पाची ही मूर्ती गेल्या ६ वर्षांपासून मुंबईहून घेऊन जात आहे. हा माझ्यासाठी महत्त्वाचा सण आहे, सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी बाप्पाची मूर्ती स्थापित केली जाते, ”इशर सांगतात. “माझी इच्छा आहे की गणपती आपल्या देशातील सैनिकांच्या मार्गात येणारे सर्व त्रास आणि अडथळे दूर करतील. माझी इच्छा आहे की गणपती बाप्पा भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करेल जेणेकरून दोन्ही स्थानिक लोक सुरक्षितपणे जगू शकतात” त्या सांगतात .
मराठमोळ्या तरुणाची मूर्ती
गेल्या ६ वर्षापासून मुंबईच्या कुर्ला येथील कार्यशाळेत कलाकार विक्रांत पांढरे यांनी ही मूर्ती तयार केली आहे. यावर्षी पांढरे यांनी गणेशमूर्तीसाठी विशेष सजावट केली आहे. गणपती बाप्पाच्या अगदी मागे,लोखंडी तारांनी कुंपण तयार केले आहे. काश्मीर खोऱ्याचे सौंदर्य दाखवणाऱ मूर्तीमागे एक मोठा बॅनरही आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलचे चित्रण देखील केले आहे, जे सीमेपासून केवळ ६०० किलोमीटर दूर आहे.
सजावटीबद्दल बोलताना ईशर म्हणाल्या, “बाप्पा भारत पाकिस्तान सीमेवर जात असल्याने, आम्हाला मुंबईत राहणाऱ्या लोकांना या दृश्याद्वारे जाणीव करून द्यायची आहे की अफगाणिस्तानची राजधानी तालिबानने ताब्यात घेतलेल्या सीमेपासून फक्त ६०० किलोमीटर दूर आहे.” सुंदर मूर्तीमागील कलाकार पांढरे यांनी अभिमान व्यक्त केला की, त्यांनी बनवलेल्या गणेश मूर्तींची जम्मू -काश्मीरमध्ये गेल्या सहा वर्षांपासून पूजा केली जाते.