Kings Charles Coronation Viral Video Horse: लंडनमधील वेस्टमिन्स्टर अ‍ॅबेमध्ये शनिवारी झालेल्या भव्य कार्यक्रमात राजे चार्ल्स तृतीय यांचा ब्रिटनचे चाळिसावे राजे म्हणून संगीतमय वातावरणात थाटामाटात राज्याभिषेक करण्यात आला. ‘गॉड सेव्ह दि किंग’चा उद्घोष, चर्चच्या घंटा आणि ट्रम्पेट वाजत असताना ७४ वर्षे वयाचे नवे सम्राट चार्ल्स यांना ३६० वर्षे जुना ‘सेंट एडवर्डस क्राऊन’ हा मुकुट घालण्यात आला. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. यामध्ये राजघराण्यातील मंडळींपेक्षा एक शाही घोडा सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

किंग्स चार्ल्स यांच्या राज्यभिषेकाच्या दरम्यान भव्य शाही थाटात घोड्यावरून घोडेस्वार जात होते, याच ताफ्यातील एक घोडा अचानक उधळला व मूळ वाट सोडून थेट प्रेक्षकांच्या दिशेने धावू लागला. हा घोडा उलट्या पावलांनी धावत रस्त्याच्या कडेला उभ्या प्रेक्षकांच्या गर्दीत शिरू लागला. अंगावर काटा आणणाऱ्या या घटनेचा एक व्हिडीओ सुद्धा व्हायरल होत आहे.

व्हिडिओच्या शेवटी तुम्ही पाहू शकता की एक माणूस अत्यंत मेहनतीने या घोड्याला शांत करण्यात यशस्वी होतो. अनेकजण या प्रकाराला कर्मचाऱ्यांच्या बेजबाबदारपणाचे नाव देत आहेत तर काहींनी तर्क लावून हा कुठला तरी नैसर्गिक संकेतच असावा असेही अंदाज बांधले आहेत.

Video : किंग्स चार्ल्स यांच्या राज्याभिषेकात घडला अंगावर काटा आणणारा प्रकार

हे ही वाचा<<…म्हणून अमोल कोल्हे ‘त्या’ बाळाच्या पाया पडले! बघता क्षणी असं घडलं तरी काय? Video होतोय व्हायरल

दरम्यान, राजे चार्ल्स व राणी कॅमिला हे नंतर पारंपरिक पोशाख परिधान करून बकिंगहॅम राजवाडय़ाच्या सज्ज्यात आले. त्यांच्या सोबत राजपुत्र व राजपुत्री वेल्स, विल्यम व केट आणि मोजके राजनिष्ठ लोक होते. नव्याने अनभिषिक्त सम्राट- सम्राज्ञीची झलक पाहण्यासाठी पावसाची पर्वा न करता अनेक तास वाट पाहात थांबलेल्या हजारो नागरिकांना या सर्वानी अभिवादन केले.