भाजपा नेते किरीट सोमय्यांचा कथित आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यात खळबळ उडाली. इतकंच नाही, तर हा विषय विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही गाजला. विरोधकांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाईची मागणी केली. दुसरीकडे किरीट सोमय्यांनीही उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून व्हिडीओंची चौकशी करण्याची मागणी केली. तसेच ट्वीट करत याची माहिती दिली. या ट्वीटनंतर सोमय्यांनी आणखी एक ट्वीट केलं. मात्र, त्या ट्वीटवरून ते ट्रोल झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

किरीट सोमय्यांनी त्या ट्वीटमध्ये म्हटलं, “मुंबई महापालिका कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी मंगळवारी (१८ जुलै) जंबो कोविड सेंटर बांधण्याचे कॉन्ट्रॅक्ट ओक मेनेजमेंट कन्सल्टन्सीला देण्यासंबंधीच्या फाईलचे आरटीआय अंतर्गत तपासणी केली. तसेच एमएमआरसीएल मुंबई मेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली.”

“तुमच्या लोकांनीच तुमचा काटा काढला”

सोमय्यांच्या या ट्वीटवर समाज माध्यम वापरकर्त्यांनी प्रतिक्रियांचा पाऊस पाडला. तसेच सोमय्यांच्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून त्यांच्यावर टीका केली. एका वापरकर्त्याने म्हटलं, “आता काही उपयोग नाही. हे सगळं ऐकण्यात जनतेला काहीच स्वारस्य नाहीय. आता तुमचा ढोंगीपणा उघडा पडला आहे. तुमच्या लोकांनीच तुमचा काटा काढला आहे.”

दुसऱ्या एका वापरकर्त्याने म्हटलं, “व्हिडीओ खरे नसतील, तर तुम्ही पोलीस तक्रार करा.”

अन्य एकाने म्हटलं, “आधी त्या व्हिडीओवर बोला. खोटा असेल, तर पोलिसांकडे तक्रार करा, पण तुमच्यावरील आरोपाला वाचा फोडा.”

“तुमचे नवीन व्हिडीओ कधी येणार आहे?” असं विचारत एका वापरकर्त्याने किरीट सोमय्यांना डिवचलं.

एकाने तर भ्रष्टाचाराचे आरोप करताना सोमय्या ज्या वक्तव्याचा वारंवार वापर करायचे त्याचा वापर केला. तो म्हणाला, “हिशोब तर द्यावाच लागणार.”

सोमय्यांच्या व्हायरल झालेल्या कथित आक्षेपार्ह व्हिडीओवरून टोला लगावत एकाने म्हटलं, “इथून पुढे एकच प्रतिक्रिया येईल की, ‘लावरे तो व्हिडीओ'”

हेही वाचा : “माझ्याकडे अनेकांनी पेनड्राईव्ह मागितला, मात्र मी…”, सोमय्यांच्या VIDEO प्रकरणी दानवेंचा हल्लाबोल

एकीकडे अनेकांनी किरीट सोमय्यांना ट्रोल केलं असलं, तरी सोमय्या समर्थकांनी त्यांना पाठिंबाही दिला आहे. एका युजरने म्हटलं, “किरीट सोमय्या यांनी आत्तापर्यंत खुपच छान लढा दिला आहे. तुम्ही सर्व पक्षातील चोरांचा चेहरा उजागर केला. सर्वसामान्य जनतेलाही कळले आहे.”

“मुंबई महानगरपालिकेत करोना काळात घोटाळे केले त्यांना सोडू नका. देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना पाठबळ देणे गरजेचे आहे,” असंही त्या वापरकर्त्याने नमूद केलं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirit somaiya get troll over his tweet after viral video pbs
Show comments