गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवण्यासाठी लोक काहीही करायला तयार असतात. विश्वविक्रम आपल्या नावे करण्यासाठी एका जोडप्याने मात्र इतके लांब चुंबन घेतले की पाहणारे फक्त पाहतच राहिले. सध्या सुरू असलेल्या व्हॅलेंटाईन वीकच्या किस डे च्या निमित्ताने एका जोडप्यानं हा अनोखा विक्रम रचलाय. हा अनोखा विक्रम एकदा नव्हे तर दोनदा रचलाय. हा अनोखा विक्रम नक्की कोणत्या जोडप्याने रचलाय, याची उत्सुकता तुम्हाला असेलच. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.
जगातील सर्वात लांब चुंबन घेतलेलं हे जोडपं थायलंडमधलं आहे. २०१३ मध्ये १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान जगातील सर्वात लांब चुंबन केल्याचा विक्रम नोंदवला होता. या जोडप्याने तब्बल ५८ तास, ३५ मिनिटे आणि ५८ सेकंद एकमेकांचे चुंबन घेत विक्रम केला होता. थायलंडच्या म्युझियम रिपल्स बिलीव्ह इट अँड नॉट की या संस्थेने हा कार्यक्रम आयोजित केला होता. व्हॅलेंटाईन वीकनिमित्त आयोजित या स्पर्धेत ९ जोडप्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत एका ७० वर्षीय जोडप्यानेही सहभाग घेतला होता.
आणखी वाचा : अशी मैत्री तुम्ही कधी पाहिली नसेल, या दोन मित्रांचा VIDEO VIRAL
थायलंडमधील पटाया येथे झालेल्या या स्पर्धेत एक्काचाय तिरनारत आणि लक्ष्या तिरनारत या दाम्पत्याने विक्रम केला. स्पर्धा जिंकल्यानंतर या जोडप्याला गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचवेळी दोघांनाही रोख पारितोषिक आणि हिऱ्याची अंगठी आयोजकाकडून देण्यात आली.
आणखी वाचा : जेव्हा दोन हत्तींमध्ये ‘दंगल’ होते, त्यानंतर असा तांडव रंगला…पाहा Viral Video
आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ही स्पर्धा जिंकणार्या जोडप्याने याआधीच किस करण्याचा विक्रम केला आहे. याआधीही या जोडप्याने २०११ मध्ये किस करण्याचा विक्रम केला आहे. जे ४६ तास, २४ मिनिटे आणि ९ सेकंद चालले. त्यादरम्यान या जोडप्याची जगभरात चर्चा झाली.
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
२०११ आणि २०१३ मध्ये दोन रेकॉर्ड बनवल्यानंतर, हे जोडपे थायलंडमध्ये खूप प्रसिद्ध झाले आणि सेलिब्रिटींप्रमाणे त्यांचे फोटो-व्हिडीओ व्हायरल झाले. त्याचा विक्रम आतापर्यंत कोणीही मोडू शकलेले नाही.