चुंबन घेण्याच्या बहाण्याने धारदार शस्त्राने पत्नीची जीभ कापल्याचा आरोप असलेल्या अय्युब मन्सुरीने त्याच्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. चुंबन घेताना जीभ अडकल्यामुळे नाईलाजाने आपल्याला पत्नीची जीभ कापावी लागली असे अय्युब मन्सुरीचा दावा आहे. मागच्या आठवडयात अहमदाबादच्या जुहापूरा भागात ही धक्कादायक घटना घडली होती. जखमी महिलेने गुरुवारी वेजालपूर पोलीस स्थानकात पतीविरोधात तक्रार नोंदवली होती. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चुंबनादरम्यान जीभ अडकल्यामुळे आपल्याला कापावी लागली असे अय्युबने पोलीस चौकशीत सांगितले. पत्नीच्या तोंडातून रक्तस्त्राव सुरु झाल्यानंतर मी घाबरलो. त्यामुळे बाहेरुन कुलूप लावले व पळून गेलो असे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. या घटनेनंतर महिलेला तात्काळ सरदार वल्लभभाई पटेल रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अजूनही महिलेला बोलता किंवा जेवता येत नाहीय.

जखमी महिला एका खासगी हॉस्पिटलमध्ये नर्स आहे. २००४ साली तिचे लग्न झाले. पण पती बरोबर मतभेद झाल्यानंतर लग्नानंतर पाच वर्षातच घटस्फोट झाला. २४ मार्च २०१८ रोजी तिने जुहापूरा येथे राहणाऱ्या अय्युब मन्सुरीबरोबर दुसरे लग्न केले. त्या माणसाची आधीच दोन विवाह झाले होते. लग्नानंतर नवरा अजूनही दुसरी पत्नी आणि तिच्या मुलाबरोबर राहत असल्याचे तिला समजले.

पीडित महिलेने यावर आक्षेप घेतल्यानंतर अय्युबने तिला त्रास द्यायला सुरुवात केली. नवरा काहीच काम करत नसल्यामुळे मी त्याला दुसऱ्या ठिकाणी नोकरी करण्याची किंवा व्यवसाय सुरु करण्याची विनंती केली. मी नोकरीचा तगादा मागे लागवल्यामुळे तो मला सतत मारहाण करायचा असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले होते. मागच्या आठवडयात मी अय्युबला पैसे द्यायला नकार दिल्यानंतर त्याने मला मारहाण केली. पण त्यानंतर आमच्यात समेट झाला.

बुधवारी रात्री अकराच्या सुमारास नवरा प्रेमाने माझ्याजवळ आला. आधी त्याने चुंबन घेतले. नंतर काही समजायच्या आत अय्युबने धारदार शस्त्राने माझी जीभ कापली असे महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले होते. नवऱ्याने नंतर बाहेरुन रुम लॉक केली व पळून गेला. महिलेने तिच्या बहिणीला व्हिडिओ कॉल करुन स्वत:ची परिस्थिती दाखवली. महिलेची बहिण तिथे पोहोचली. तिने शेजाऱ्यांकडून दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला व महिलेला रुग्णालयात दाखल केले.