Kitchen Jugaad Viral Video : तुमच्यापैकी अनेक गृहिणींचा असा अनुभव असेल की, भांडी घासण्याचा साबण आठवडाभरात संपतो. अर्धा साबण वापरून संपतो आणि अर्धा पाण्यात विरघळून जातो. अशा वेळी विरघळलेल्या साबणात भांडी घासताना पाणी तर खूप लागतेच. त्याशिवाय आठवडाभरात नवीन साबणाची वडी खरेदी करावी लागते. पण, भांडी घासण्याच्या साबणावर होणारा खर्च आता वाचणार आहे. कारण- सोशल मीडियावर सध्या असा एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात साबणाची एक वडी जास्त दिवस वापरण्यासाठी हटके जुगाड केला गेला आहे.

भांडी घासताना साबणाच्या भांड्यात अनेकदा पाणी जमा होते, ज्यामुळे साबण हळूहळू विरघळू लागतो. अशा विरघळलेल्या साबणाने भांडी घासल्याने पाणीदेखील जास्त लागते. पण, व्हिडीओमध्ये महिलेने असा जुगाड केलाय, ज्यामुळे साबण वितळणार नाही आणि तो जास्त काळही चालेल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक महिला स्वयंपाकघरातील भांडी धुण्यासाठी असलेल्या साबणाच्या डिशमधून साबण काढते. त्यानंतर साबणाच्या डिशभोवती एकेक करून आडवे- उभे चार प्लास्टिक रबर लावते आणि नंतर त्यावर साबण ठेवते. त्यामुळे साबण पाण्यापासून दूर ठेवता येतो आणि तो दीर्घकाळही चालतो. परिणामी तुमच्या पैसे आणि पाण्याची बचत होते.

हा जबरदस्त किचन जुगाड व्हिडीओ @shiprarai2000 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. महिलेने तिच्या जुगाडाचा व्हिडीओ पोस्ट करीत कॅप्शनमध्ये दावा केला की, हा हॅक वापरल्यानंतर साबण वितळणार नाही आणि जास्त काळ टिकेल. अनेक युजर्स म्हणतायत की, एवढा खटाटोप करण्यापेक्षा साबणाच्या भांड्याला खालून होल केल्यास उर्वरित पाणी निघून जाईल आणि साबणही जास्त दिवस टिकेल. तर, काहींनी हा बेस्ट जुगाड असल्याचे म्हटलेय.

Story img Loader