Kitchen jugad: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान एका गृहिणीने खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. एका गृहिणीने हा जुगाड दाखवला हे. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.गृहिणींकडे बरेच घरगुती भन्नाट जुगाड असतात. काही गृहिणी सोशल मीडियावर हे जुगाड शेअर करतात. अशाच एका गृहिणीने शेअर केलेला हा जुगाड सध्या खूप व्हायरल होतोय, जो तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल. खरंतर मेथी खाणे आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. पण ही भाजी निवडण्यासाठी बराच वेळ लागतो. पण मेथी निवडण्याची सोपी पद्धत तुम्हाला कळली तर?

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेथीचा पराठा, मेथीची पुरी अथवा मेथीच्या भाजीचे नाव काढले की तोंडाला पाणी सुटते. मेथीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म असतात, ज्यामुळे यकृताचे आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळते. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठीही ही भाजी फायदेशीर आहे. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते. एका महिलेने मेथी साफ करण्याचा एक भन्नाट आणि अतिशय सोपा जुगाड दाखवला आहे.ही ट्रिक पाहून अनेकजण अचंबित झालेले आहेत.

होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक महिला हाताने मेथीची भाजी निवडत असते.मात्र त्यानंतर ती सांगते ही योग्य पद्धत नाही.मग महिला एक झारा घेते.त्यात मेथीचे थेट त्यात टाकते आणि दुसऱ्या बाजूने ते देठ ओढते.अशा पद्धतीने ती मेथी न कोणतीही मेहनत घेण्याआधीच निवडली जाते.

पाहा व्हिडीओ

दुसरी टिप

मेथीच्या पानांमध्ये भरपूर माती असते. म्हणजेच कुठल्याही पालेभाजी, फळभाजीत असते. जमिनीखालून येणाऱ्या फळभाज्यांमध्येही माती असते. त्यामुळे त्यांना अनेक वेळा स्वच्छ पाण्याने धुवावे लागते. प्रथम मेथीची पाने 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवावीत. यानंतर एका मोठ्या भांड्यात पाण्यात मीठ घालून उकळावी. या पाण्यात धुतलेली मेथीची पाने फक्त 2 मिनिटे राहू द्या आणि नंतर पाणी फेकून द्या.