नारळाला आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये खूप महत्त्व आहे. अगदी पुजा विधीपासून ते खाद्यपदार्थांपर्यंत नारळाचा आवर्जून वापर केला जातो. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये नारळ हा हमखास असतो. पूजेसाठी असो किंवा स्वयंपाकासाठी शेंड्या काढलेला लागतो आणि नारळाच्या शेंड्या काढणे जरा किचकट काम आहे. नारळाच्या शेंड्या काढायच्या म्हणजे स्क्रु ड्रायव्हर किंवा लोखंडी उलाथणे सारखी टोकदार वस्तू वापरून एक एक शेंडी सोलावी लागते. सर्व ताकदपणाला लावून नारळाच्या शेंड्या काढाव्या लागतात. पूजेसाठी नारळ वापरताना नारळ्याच्या वरच्या बाजूला शेंडी ठेवली जाते पण स्वयंपाकसाठी नारळ वापरताना सर्व बाजूने शेंड्या काढतात. रोजच्या धावपळीमध्ये महिलांना नारळाच्या शेंड्या सोलत बसयाला वेळ नसतो. अशा परिस्थिती महिलांना सर्व काम बाजूला ठेवून नारळ सोलात बसावे लागते. त्यामुळे महिलांचा वेळ वाया जातो आणि खूप मेहनत करावी लागते. पण या लेखात असा जुगाड सांगणार आहोत जे ऐकून तुम्ही थक्क व्हाल. हा सोपा जुगाड वापरून तुम्हाला झटपट नारळाच्या शेंड्या सोलू शकता ज्यामुळे तुमचा वेळही वाचेल आणि फार मेहनत करावी लागणार नाही. चला तर मग जाणून घेऊ या… सोपी ट्रिक

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारळाच्या शेंड्या सोलण्याचा जुगाड

प्रथम एका भांड्यात पाणी उकळवा आणि त्यानंतर नारळ ठेवा आणि काहीवेळ त्यात ठेवा. जर तुमच्याकडे गिझरचे पाणी असेल त्यातही ठेवू शकता. सहसा उभे भांडे वापरा ज्यामध्ये नारळ पुर्णपणे बुडणार नाही जेणेकरून पाणी उकळल्यानंतर नारळाच्या कोरडा भाग पकडून नारळ पाण्यातून बाहेर काढता येईल. आता नारळ पाण्यातून बाहेर काढा आणि चांगली धार असलेला चाकू घेऊन अननस कापतात तसे नारळाच्या शेंड्या कापा. फळ कापल्यासारखे नारळाच्या शेंड्या अगदी सहज कापल्या जातात. तुम्हाला जास्त ताकद लावण्याची आणि फार व्याप करण्याची काप नाही. ज्या कामासाठी तुमचा वेळ वाया जात होता ते काम झटक्यात होईल. सर्व बाजूने नारळाची साल कापून घ्या. तुम्ही नारळाची साल काढून फ्रिजमध्ये ठेवू शकता. तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी नारळ वापरायचा असेल तर नारळ प्लॉस्टिकच्या पिशवीत ठेवा आणि मग तो फ्रिजमध्ये ठेवा. तुम्हाला नारळ लगेच वापरायचा असेल तर नारळ काही वेळ गॅसवर ठेवून गरम करा आणि त्यानंतर तो नारळ फोडा. नारळ फोडल्यानंतर त्यातले खोबरे सहज निघेल. तुम्हाला चाकूने खूप जोर लावून खोबरे काढण्याची आवश्यकता नाही. जर फोडलेला नाऱळाचे अर्धा शिल्लक असेल तर तो तुम्ही फिजरमध्ये ठेवू शकता जेणेकरून तो जास्त दिवस टिकेल.

हेही वाचा – दूध, पनीर व दही यांपैकी कोणता पदार्थ आहे सर्वांत जास्त फायदेशीर? कसे करावे सेवन, घ्या तज्ज्ञांकडून जाणून….

हेही वाचा – Fact check : खरंच शेवग्यामध्ये दह्यापेक्षा नऊ पट जास्त प्रथिने असतात? तज्ज्ञांनी केला खुलासा

तुम्हाला युट्यूबवर Maa, yeh kaise karun? या चॅनेलवर हा व्हिडिओ पाहता येईल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kitchen jugad tired of removing coconut shells use this simple trick once and it will work in no time snk