Kitchen jugad video: गृहिणींकडे काही ना काही किचन जुगाड असतात, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी किचनमधल्याच वस्तूंनी चुटकीशीर होऊन जातात. दरम्यान आता गृहिणीने नाहीतर एका व्यक्तीनं खास महिलांसांठी आज असाच एक हटके आणि टेन्शन दूर करणारा जबरदस्त असा किचन जुगाड दाखवला आहे. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. तुम्हीही हे पाहून अवाक् व्हाल. बऱ्याच वर्षांपासून असलेलं तुमचं टेन्शन या जुगाडामुळे नक्कीच कमी होईल. या हटके जुगाडाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. जो तुम्हाला असा विचित्र वाटेल. पण, परिणाम पाहिला तर तुम्ही थक्क व्हाल.
जर तुम्हाला खूप लोकांचं जेवण करायचं असेल तर आता तुम्हाला आचारी बोलावयची किंवा खूप लोकांना कामाला लावण्याची गरज नाही. तसेच एकही पैसे खर्च न करता एका चाकूनं तुम्ही २० ते २५ किलो भाज्या अवघ्या ३० सेकंदात कापू शकता. होय, विश्वास बसत नाहीये? तर मग हा व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक तरुण दिसत आहे जो तब्बल २० किलो टॉमेटो अवघ्या ३५ सेकंदात कापून दाखवतोय. इतक्या झटपट काम कुठल्याही मशीनने तो करत नाहीये तर एक ट्रिक वापरुन करत आहे. त्यानं एका भल्यामोठ्या टोपात २० किलो टॉमेटो घेतले आणि दोन चाकूंच्या मदतीनं अंधाधुंद हल्ला केला. बस्स! अवघ्या ३५ सेकंदात या सर्व टोमॅटोंचे बारीक तुकडे झाले. आता हे एवढे टोमॅटो जर तुम्ही एक एक करुन कापायला गेलात तर तुम्हाला किती तास लागतील विचार करा. पण कितीतरी तासांचं काम या अनोख्या जुगाडमुळे अवघ्या काही सेकंदात झालं.
पाहा व्हिडीओ
या तरुणानं अतिशय सोपा जुगाड दाखवला आहे. ही ट्रिक पाहून अनेकजण अचंबित झालेले आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ mprajapata1 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.