नलिनी मुंबईकर…नाव घेताच डोळ्यासमोर येते ती मस्त कोळी पद्धतीची चमचमीत मेजवाणी. सोशल मीडियाद्वारे प्रत्येक गृहिणीच्या मनात स्थान करणाऱ्या नलिनी मुंबईकरांना आता कोण ओळखत नाही असं नाहीये. मम्मी आज काय स्पेशल या वाक्यानं त्यांच्या व्हिडीओची सुरुवात होते आणि त्यानंतर संपूर्ण रेसिपी बनवून होईपर्यंत आपणही काही व्हिडीओ स्क्रोल करत नाही. नलिनी मुंबईकर यांचा संघर्षही आपल्याला सगळ्यांना माहितीये.
आईच्या आजारपणामुळे नलिनी यांना १२ व्या वर्षापासूनच स्वयंपाकाची गोडी लागली. सकाळी पाच वाजता उठून मासे विकण्यापासून ते आता टीव्हीवर झळकण्यापर्यंत त्यांचा प्रवास खूप मोठा आहे. मुलगा विक्रांत मुंबईकर याने आपल्या आईची आवड लक्षात घेऊन तिला एक वेगळी ओळख मिळवून दिली. दरम्यान रुचकर स्वयंपाक बनवण्यासाठी महाराष्ट्राच्या घराघरात पोहचलेली कोळीन बाय आता चक्क दुबईकरांना आपल्या हातची चव चाखवणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल अलिबागची कोळीन बाय अन् दुबईत ते कसं? तर हा व्हायरल व्हिडीओ पाहा तुमच्या सगळं लक्षात येईल.
आपल्या सगळ्यांना माहितीये आता व्हॅलेंनटाईन विक सुरु आहे. या दिवसांमध्ये तरुणाईमध्ये प्रेमाची भरती येते. अनेक जण आपल्या प्रियकरासोबत, प्रेयसीसोबत काही ना काही प्लॅन करतात. मात्र नलिनी मुंबईकर यांचा मुलगा चक्क आई-वडिलांसोबत व्हॅलेंनटाईन विक साजरा करायला दुबईत पोहचला आहे. नलिनी मुंबईकर यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक सामान्य कोळीन बाय आज विमानानं दुबईला गेली आहे. दुबईमध्ये त्या वेगवेगळ्या ठिकाणी फिरतानाही दिसत आहे. बुर्ज खलिफा, दुबई मॉल, गोल्ड मार्केट यांसारख्या प्रसिद्ध ठिकाणी त्यांनी भेटी दिल्या आहेत.
खरतर दुबईत होणाऱ्या कोळी मोहोत्सवासाठी मुंबईकर कुटुंब दुबईत पोहचलं आहे. परदेशात राहून भारतीय खाद्यपदार्थाची चव मिस करणाऱ्या प्रत्येकासाठीच हा कोळी मोहोत्सव पर्वणी ठरणार आहे.
पाहा व्हिडीओ
हेही बघा >> VIDEO: जिथं भीती संपते तिथं आयुष्य सुरु होतं! एक सिंहीण १२ तरसांशी एकटी भिडली
आपल्या आजूबाजूला अशी अनेक उदाहरणं असतात ज्यामध्ये महिलांकडे कला असते मात्र योग्य व्यासपीठ न मिळाल्यानं त्या मूल अन् चूल या चौकटीतच अडकून राहिल्या. मात्र असं असलं तरी आता सोशल मीडियासारखं मूक्त व्यासपीठ आपल्याला मिळालं आहे. याच व्यासपिठाचा योग्य वापर करता आला पाहिजे. जसा निलिनी ताईंनी केला.