Kitchen Queen Nalinee Mumbaikar : नलिनी मुंबईकर हे रिल्स आणि व्हिडीओच्या जगातील एक असं नावं आहे ज्यांनी एक आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. रुचकर स्वयंपाक बनवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या नलिनी मुंबईकर यांनी लोकसत्ताच्या इन्फ्ल्यूएंसरच्या जगात या खास सिरीजमध्ये हजेरी लावली.
स्वयंपाक बनवायला आणि खायची आवड असणारा प्रत्येक व्यक्ती हा नलिनीताईंचा चाहता असू शकतो. नलिनीताईंनी इन्स्टाग्राम आणि युट्यूबवर शेअर केलेल्या व्हिडीओवर युजर्स कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतात.याच नलिनीताईंविषयी कधी न ऐकलेल्या गोष्टी आणि अचंबित करणारा त्यांचा जीवनप्रवास आपण या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

नलिनीताई अत्यंत साधं व्यक्तिमत्त्व. कधीही कुठे बाहेर गेलेल्या नाही. घर, जबाबदारी सांभाळणाऱ्या नलिनीताई स्टार असूनही आजही मासे विकायला जातात. घरची कामे आवरुन नंतर व्हिडीओसाठी वेळ काढतात.
साधं आयुष्य जगणाऱ्या नलिनीताई जेव्हा स्टार बनल्या, तेव्हा त्यांच्या आयुष्यात काय बदल दिसून आला, आजुबाजूंच्या लोकांची काय प्रतिक्रिया होती? याविषयी नलिनीताई दिलखुलासपणे व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे. याशिवाय काही भन्नाट किचन टिप्स सुद्धा त्यांनी दिल्या आहेत.

नलिनीताईंबरोबरच्या या गप्पा तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी लोकसत्ताच्या पेजवर व्हिडीओ सेक्शनला भेट द्यायला विसरू नका.