Best Travel Destinations For August Holidays : ऑगस्ट महिन्यात अनेक सुट्ट्या असल्याने मोकळेपणाने एन्जॉय करता येणार आहे. या महिन्याची सुरुवातच फ्रेंडशिप डे नं होत असल्याने मित्रपरिवार आणि कुटुंबियांसोबत वेळ घालवण्यासाठी चांगली संधी आहे. जर तुम्ही १४ ऑगस्टला सुट्टी घेतली, तर १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत तुम्हाला चार दिवसांची सुट्टी मिळेल. ज्यामुळे फिरायला जाण्यासाठी तुम्हाला मनाप्रमाणे फावळा वेळ काढणे शक्य होईल. याशिवाय तुम्हाला पिकनिकला जाण्यासाठी ऑगस्ट महिन्यात ही ठिकाणे चांगला विकल्प ठरू शकतात. अशातच पावसाळी हंगामात खास ठिकाणी जाण्यासाठी ट्रिपचं प्लनिंग करा. जाणून घेऊयात ऑगस्ट महिन्यात फिरण्यासाठी कोणती ठिकाणी बेस्ट आहेत. ज्या ठिकाणी तुम्ही मोकळेपणाने एन्जॉय करु शकता.
१) मनाली
ऑगस्टच्या पहिल्या रविवारी फ्रेंडशिप डे आहे. अशातच तुम्ही विकएंड ट्रिपला मित्रांसोबत मनालीला जाऊ शकता. इथे तुम्ही अनेक अॅडवेंचर स्पोर्ट्स खेळण्याचा आनंद घेऊ शकता. मनालीत नैसर्गिक सौंदर्य, धबधबे आणि दरी पाहण्याचा मनमुराद आनंद लुटू शकता.
२) चेरापूंजी
ऑगस्टमध्ये सर्वात जास्त सुट्ट्या १५ ऑगस्टपूर्वी असलेल्या वीकएंडला आहेत. त्यामुळे तुम्ही १२ ऑगस्ट ते १५ ऑगस्टपर्यंत चार दिवसांच्या सुट्टीसाठी चेरापूंजीला फिरायला जाऊ शकता. १४ ऑगस्टच्या सुट्टीला मेघालयच्या चेरापूंजी येथील निसर्गात एन्जॉय करू शकता. इथे वर्षभर पाऊस पडतो. अशातच तुम्ही इथे रोमांचक मान्सून ट्रेकिंग आणि चहाच्या बागेत फिरू शकता.
३) माउंट आबू
ऑगस्ट महिन्यात राजस्थानचा बेस्ट हिल स्टेशन माउंट आबूला फिरायला जाऊ शकता. या हिल स्टेशनचं सौंदर्य आणि प्राकृतिकता या हवामानात मनमोहक होते आणि या ठिकाणी तुम्ही जोधपूरचे किल्ले, मंदिर आणि स्थानिक फूडवर ताव मारू शकता.
४) मथुरा-वृंदावन
रक्षाबंधनच्या एक दिवसाच्या सुट्टीला संपूर्ण कुटुंब एकत्र येतं. त्यामुळे तुम्ही कुंटुंबासह मथुरा वृंदावनला फिरायला जाऊ शकता. या ठिकाणी गोकुल धाम, गोवर्धन पर्वत, प्रसिद्ध मंदिरे पाहायला मिळतील. तसंच सायंकाळी तु्म्ही यमुना तटावर होणारी आरती पाहू शकता.