Cow Cuddling Health Benefits : प्रेमीयुगुलांना प्रतिक्षा असलेला व्हॅलेंटाईन डे दरवर्षी १४ फेब्रुवारीला साजरा केला जातो. पण यंदाच्या १४ फ्रेब्रुवारीला केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि मत्स्यव्यवसाय विभागाने व्हॅलेंटाईन डे काऊ हग डे म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, देशभरातून या निर्णयाला विरोध होत असल्याने केंद्र सरकारने हा निर्णय मागे घेतला. पण गायीला मिठी मारल्याने आरोग्याला अनेक फायदे होऊ शकतात, असं एका संशोधनाच्या माध्यमातून समोर आलं आहे. गायीला मिठी मारल्याने अनेक आजारांपासून सूटका होऊ शकते, असंही बोललं जात आहे. तसेच मानसिक आरोग्य उत्तम राहण्यासही मदत होते.
शरीर निरोगी आणि उत्तम राहण्यासाठी तसेच मनालाही प्रसन्नता मिळण्यासाठी नवनवीन वेलनेस ट्रेंडविषयी आपण ऐकलं असेल. पण गोट योगा आणि साऊंड बाथ अशाप्रकारच्या ट्रेंड्समुळं आरोग्या सृदृढ राहण्यास मदत होते. शेळ्यांच्या सानिध्यात योगासनं करणं म्हणजेच गोट योगा होय. तर विविध प्रकारच्या ध्वनींच्या सानिध्यात भरपूर वेळ मग्न राहणे, याला साऊंड बाथ असे म्हणतात. पण आता एका नव्या वेलनेस ट्रेंडची चर्चा सुरु झाली आहे. नेदरलॅंडमधील एका वेलनेस ट्रेंडमुळं आरोग्याला खूप फायदे होतात असा दावा करण्यात आला आहे. या ट्रेंडला डच भाषेत Koe knuffelen’ असंही म्हणतात. गायीला मिठी मारणे असा याचा अर्थ होतो. मन सृदृढ करण्यासाठी आणि मानसिर आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी सकारात्मक उर्जा मिळवण्याकरता गायीच्या सानिध्यात राहणे आवश्यक असते, असाही दावा करण्यात आला आहे. तसेच काऊ कडलिंग थेरेपीचाही आरोग्यास लाभ होत असल्याचं बोललं जात आहे.
गायींच्या जवळ गेल्यावर त्यांना स्पर्श केल्यावर त्यांच्या शरीरातील उबदारपणा आपल्याला माहित होतो. गायीच्या अंगावरुन हात फिरवल्याने मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. गायींच्या सानिध्यात राहिल्यावर मन:शांती मिळते, असंही म्हटलं जात आहे. कारण गायींच्या शरीरात ऑक्सिटोसी नावाचं संप्रेरक असतात. याचा फायदा मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी होऊ शकतो. तसेच तुमची सकारात्मकताही वाढू शकते. नेदरलॅंडमधील काही भागात गायींना सानिध्यात राहून त्यांना मिठी मारण्याची प्रथा आहे. पाळीव प्राण्यांसोबत काही माणसं प्रेमळ राहतात. हे प्राणीही माणसांसोबत बागडत असतात. पण गायींच्याजवळ जाऊन त्यांच्या मानेवरून आणि पाठीवरून हात फिरवल्याने मन प्रसन्न झाल्यासारखं वाटू शकतं.