Chameleon Climbing Multi-Coloured Stick Video Viral : ‘रंगबदलू गिरगीट’ असं काही माणसांना त्यांच्या स्वभावाचे गुण पाहून म्हटलं जातं. पण प्रत्यक्षात सरडा पाहिल्यावर तो अचानक अनेक रंग कसे बदलतो, असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. रानावनात असणाऱ्या छोट्या वनस्पतींवर सरडा रंग बदलत असतो. मात्र, सरड्याचं हे रंगीबेरंगी दृष्य क्वचितच तुम्ही पाहिलं असेल. पण आता व्हायरल झालेल्या एका व्हिडीओनं सरड्याचं रंग बदलण्याचं तथ्य सर्वांसमोर आणलं आहे. एका रंगीत काठीवर सरडा चढत असताना तो त्या काठीच्या रंगाप्रमाणे रंग बदलतो. सरड्याची रंग बदलण्याची भूमिका नेमकी कशी असते, हे या व्हिडीओच्या माध्यमातून समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक पाळीव सरडा छोट्या काठीवर चढत असताना तो वेगवेगळे रंग बदलतो आणि हातात काठी धरलेल्या व्यक्तीच्या हाताजवळ जातो. काठीला ज्याप्रकारे रंग दिलेले असतात, त्याप्रमाणे सरडा रंग बदलत असतो. सरडा सुरुवातीला निळा रंगाने काठीवर चढतो. त्यानंतर थोड्या अंतरावर गेल्यावर तो निळ्या रंगाला पिवळ्या रंगात बदलतो. तसंच काठीच्या मध्यभागी गेल्यावर तो हिरव्या रंगाच्या छटांसह नारंगी आणि गुलाबी रंगही बदलतो. त्यानंतर तो माणसाच्या हातावर जातो.

नक्की वाचा – कुर्ला-मानखुर्द दरम्यान तरुणाची खतरनाक स्टंटबाजी, ट्रेनमधील व्हिडीओ व्हायरल, पोलीस म्हणाले,”कोणत्याही प्रवाशाने…”

इथे पाहा सरड्याचा सुंदर व्हिडीओ

सरड्याचा हा व्हिडीओ ट्वीटरवर शेअर करण्यात आला आहे. हा जबरदस्त व्हिडीओ तुफान व्हायरल झाल्याने लाखोंच्या संख्येत या व्हिडीओला व्यूज मिळाले आहेत. हा व्हिडीओ शेअर करत सुंदर कॅप्शनही देण्यात आलं आहे. सरडा रंग का बदलतो? यामागे नेमकं काय कारणं आहे? या प्रश्नाचं उत्तर एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलंय, सरडा दोन कारणांसाठी रंग बदलतो. शरीरातील तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी सरडा रंग बदलत असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Know the reason behind chameleon multi coloured positions chameleon climbs on colorful sticks video viral nss