Ram Mandir: : राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अत्यंत कमी वेळ राहिला आहे. याकार्यक्रमाला भव्य स्वरुप देण्यासाठी अयोध्येत तयारीला अंतिम स्वरुप दिले जात आहे तर दुसरीकडे संपूर्ण देशभरातील लोकांना या उत्सवामध्ये समाविष्ठ करण्यासाठी श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र विशेष प्रयत्न करताना दिसत आहे. ट्रस्टसंबधीत लोक सामान्य लोकांना आमंत्रण देण्यासाठी अक्षतासंह निमंत्रण देण्यासाठी त्यांच्या घरी जात आहे. राममंदीराच्या प्राण प्रतिष्ठेच्या कार्यक्रमासंबधीत आमंत्रण पत्रिकेमध्ये काय लिहिले आहे ते जाणून घेऊ या.

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख आणि वार

आमंत्रण पत्रिकेच्या सुरुवातीला ‘ॐ’ असे लिहिलेले आहे. त्याच्या खाली विश्वाभरातील रामभक्तांना निवेदन. आमंत्रण पत्रिकेमध्ये पुढे लिहिले आहे की, “माता, भगिणी आणि बंधुनो,
येणाऱ्या २२ जानेवारी २०२४,( पौष शुल्क, द्वादशीशके १९४५)या शुभ दिवशी श्री रामजन्मभूमीवर राम बांधण्यात येत असलेल्या मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहात श्रींरामाच्या बालस्वरूपातील नवीन मूर्ती विराजमान होऊन तिची प्राण प्रतिष्ठा केली जाईल.”

हेही वाचा – अंतराळात एकाच दिवसात १६ वेळा नववर्षाचे स्वागत करू शकतात अंतराळवीर; नासाने उलघडले रहस्य

प्राण प्रतिष्ठा कार्यक्रमाची वेळ काय आहे?

आमंत्रण पत्रात लिहिले आहे की, “या निमित्ताने अयोध्येत अभूतपूर्व आनंदाचे वातावरण असेल. तुम्हीही प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी (सकाळी ११ ते दुपारी १.00 दरम्यान) तुमच्या गावात, परिसर, कॉलनीतील कोणत्याही मंदिराच्या शेजारील राम भक्तांना एकत्र करून भजन-कीर्तन करावे आणि दूरदर्शन किंवा कोणताही स्क्रीन वापरून ( एल. ई. डी. पडदे लावून) अयोध्येचा प्राणप्रतिष्ठेचा सोहळा समाजाला दाखवा. शंखनाद करावा, घंटा वाजवा, आरती करा, प्रसाद वाटा.”

हेही वाचा – रात्री उशीरा पार्टी करण्यासाठी कर्मचाऱ्याने बॉसला मागितली सुट्टी! Whatsapp चॅट झाले व्हायरल; नेटकरी म्हणाले, ”बॉस..”

भजन किर्तन करण्याचे आवाहन

पत्रात पुढे लोकांना विनंती केली आहे की, “कार्यक्रमाचे स्वरूप मंदिर (राम मंदिर) – केंद्रित असावे, मंदिरात असलेल्या देवतेची पूजा, भजन – कीर्तन – आरती इ. करावे सर्व देवी-देवता प्रसन्न होतील. संपूर्ण भारताचे वातावरण सात्विक आणि राममय होईल. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे दूरदर्शनद्वारे थेट प्रक्षेपण केले जाईल आणि अनेक चॅनेलद्वारे देखील प्रसारित केले जाईल.”

Know what is written in the invitation card of Ram Mandir Pran Pratishtha ceremony 2024 or Ram Temple 2024 inauguration
राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं आमंत्रण पत्रिका

संध्याकाळी दिवा लावावा ही विनंती

श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्राने आमंत्रण पत्रात पुढे लिहिले आहे की, “प्राण-प्रतिष्ठेच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्तानंतर देवांना प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरासमोर दिवा लावा आणि जगभरातील कोटी घरांमध्ये दीपोत्सवाला साजरा होवो. आपणास विनंती आहे की, प्रभू श्री राम लल्ला आणि नव्याने बांधलेले मंदिर (राम मंदिर) पाहण्यासाठी आपल्या सोईस्कर वेळी आपल्या कुटुंबासह अयोध्या येथे यावे. श्री रामजींचा आशीर्वाद मिळो.”

पत्रिकेच्या शेवटी निवेदक म्हणून श्री रामजन्मभूमी तिर्थक्षेत्र असे लिहिले आहे.

Story img Loader