Return Kohinoor to India: राणी एलिझाबेथ यांच्या निधनांनंतर त्यांचे सुपुत्र चार्ल्स राजगादीवर बसणार आहेत. ६ मे रोजी त्यांच्या राज्याभिषेकाचा सोहळा पार पडणार आहे. राज्याभिषेक सुरु असताना मुकुट परिधान करण्याची प्रथा आहे. या सोहळ्यामध्ये राजा चार्ल्स यांच्या पत्नी, राणी कन्सोर्ट कॅमिला कोहिनूर हिरा जडलेला राजमुकुट परिधान करणार की नाही यावरुन मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे. दरम्यान बकिंगहॅम पॅलेसने राणी कॅमिला कोहिनूर असलेला राजमुकुट घालणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. या प्रकरणामुळे कोहिनूरबाबतचा जुना वाद पुन्हा एकदा सुरु झाला आहे.
चार्ल्स यांच्या राज्याभिषेकाच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या कोहिनूर प्रकरणावर इंग्लंडमधील एका लोकप्रिय वृत्तवाहिनीवर एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेव्हा वृत्तवाहिनीमधील एम्मा वेब आणि नरिंदर कौर या दोन महिला पत्रकारांमध्ये शाब्दिक वादविवाद झाला. संबंधित कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या कार्यक्रमामध्ये एम्मा यांनी ‘कोहिनूर हिरा लाहोरच्या शासकाकडे होता. तर त्यावर पाकिस्तानचा हक्क असायला हवा ना? त्यांनी कोहिनूर पर्शियन साम्राज्यामधून चोरला होता. हा हिरा एक विवादित वस्तू आहे’, असे भाष्य केले. त्यावर प्रतिवाद करताना नरिंदर यांनी ‘तुम्हाला खरा इतिहास ठाऊक नाही. इतिहासामध्ये तुम्हाला वसाहतवादामुळे झालेला रक्तपात पाहायला मिळेल. कोहिनूर भारताला परत द्या. भारतीयांना आपल्या देशातील मौल्यवान वस्तू पाहण्यासाठी पैसे देण्याची गरज काय आहे असा प्रश्न मला पडतो’, असे म्हणत आपली बाजू मांडली.
विश्लेषण : आख्ख्या जगाला भुरळ घालणारा कोहिनूर हिरा नेमका आला कुठून? काय आहे या हिऱ्याचा इतिहास?
भारतीय वंशाच्या नरिंदर कौर यांनी हा व्हिडीओ रिट्विट केला आहे. यामध्ये त्यांनी ‘कोहिनूर हिरा भारतीय भूमीमधून निघाला आहे. कोहिनूर इंग्लंडमध्ये असणे हे ब्रिटीशांच्या गडद, क्रूर वसाहतवादी धोरणांचे प्रतीक आहे. ते वसाहतवादाचा आणखी फायदा घेऊ शकत नाही. आपल्या देशाचा खजिना पुन्हा मिळवण्याचा अधिकार संयुक्त संघाच्या नियमांमध्ये नमूद करण्यात आला आहे’, असे म्हटले आहे.
“प्यार किया तो डरना क्या” भरवर्गात शिक्षकांसमोर गर्लफ्रेंडशी बोलणाऱ्या विद्यार्थ्याचा Video व्हायरल
दीडशे वर्ष राज्य केल्यानंतर भारतातील ब्रिटीश राज्यसत्ता संपुष्टात आली. या भल्यामोठ्या कालावधीमध्ये ते अर्थव्यवस्थेवर नियंत्रण ठेवून होते. आपल्या देशातील अनेक मौल्यवान गोष्टी त्यांनी इंग्लडला नेल्या. या मौल्यवान वस्तूंमध्ये कोहिनूर हिऱ्याचा समावेश होता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेकदा कोहिनूर हिरा भारतामध्ये आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. पण या प्रयत्नांना आजवर यश आलेले नाही.