Kokanhearted Girl Ankita Walawalkar: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमाचा स्टार ओंकार भोजनेने कोकणहार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकर हिचा चाहता असल्याची कबुली दिली होती. यानंतर या दोघांच्या अफेअरबाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. नंतर अंकिताने स्वतः यावर स्पष्टीकरण देत आपण दोघे मित्र असल्याचं सांगितलं होतं. पण स्वतः ओंकार भोजने जिचा चाहता आहे त्या अंकिताचा क्रश कोण हा प्रश्नही तिच्या फॉलोवर्सना पडला होता. अलीकडेच लोकसत्ता ऑनलाईनच्या ‘इन्फ्लुएन्सरच्या जगात’ या कार्यक्रमात अंकिता व तिच्या कुटुंबियांशी गप्पा मारताना कोकणहार्टेड गर्लने अगदी मजेशीर अंदाजात आपल्या क्रशविषयी सुद्धा सांगितलं.
अंकिताचा क्रश कोण असं विचारलं असता ती म्हणाली की, “आता माझे क्रश पण सगळे संपले आहेत (क्रशच व्हायची वेळ आली आहे). पण मला सुरुवातीला एक अभिनेता खूप आवडायचा. एका कार्यक्रमात आम्ही भेटलो होतो तेव्हा त्याने मला खूप ऍटिट्यूड दाखवला, मग मला काही त्याचा स्वभाव आवडला नाही आणि मग मी त्याला इंस्टाग्रामवर लगेच अनफॉलो करून टाकलं.” अंकिताने नाव घेतलं नसलं तरी आपला हा क्रश एक लग्न झालेला अभिनेता होता याची मात्र तिने गमतीत कबुली दिली आहे.
याशिवाय अंकिताने या रॅपिड फायरमध्ये आपल्या मुंबईच्या आवडत्या पदार्थांविषयी, आवडत्या नेत्यांविषयी सुद्धा भाष्य केलं आहे. त्यासाठी ही रील आवर्जून पाहा.
अंकिता वालावलकर हिच्या कुटुंबीयांसह सुद्धा आम्ही गप्पा मारल्या. तिच्या लव्ह स्टोरीच्या व्हिडिओनंतर त्यांनी तिला कशाप्रकारे सांभाळून घेतलं, तिचं कुटुंब, मित्र तिच्या पाठीशी कसे उभे राहिले व एकूणच वालावलकर कुटुंब कसं आहे याविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी इन्फ्लुएन्सरच्या जगातचा हा एपिसोड सुद्धा आवर्जून पाहा.
हे ही वाचा<< “ओंकार भोजनेला भेटायला गेले पण माझा चेहरा..”, कोकण हार्टेड गर्लने शेवटी ‘त्या’ फोटोचं गुपित केलं उघड
तुम्हाला अंकिताची मुलाखत कशी वाटली कळवा. शिवाय अजून कोणत्या इन्फ्लुएन्सरला भेटायला, त्यांच्याविषयी जाणून घ्यायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा.