Kolhapur Accident Viral Video: रस्ते अपघातांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. यामध्ये काही अपघात हे वाहन चालकाच्या चुकीमुळे होताना दिसतात, तर काही अपघात हे दुसऱ्याच्या चुकीमुळे घडत असतात. असाच एक कोल्हापूरमधला लाइव्ह अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो अक्षरश: अंगावर काटा आणत आहे. हा व्हिडीओ एक उदाहरण म्हणूनदेखील समोर आला आहे, ज्याला पाहून तुम्ही रस्त्यानं चालताना किती सतर्क राहायला पाहिजे हे दाखवत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्याही काळजाचा थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही. हा अपघात एवढा भयानक आहे की याचा व्हिडिओ पाहून कुणाच्याही अंगावर काटा उभा राहील.

कोल्हापूरमध्ये सायबर चौकात भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. भरधाव कारने चार वाहनांना जोरदार धडक दिली अन् त्यानंतर या कारने चौघांना चिरडले. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. या व्हिडीओमध्ये पाहू शकता,रस्त्यावर फारशी वर्दळ नव्हती. सर्वसामान्यपणे वर्दळ होती. यावेळी चौकामधून रस्त्या ओलांडत असताना भरधाव कारने चार दुचाकींना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकीवरील काही जण चेंडूसारखे दूरवर फेकले गेले. हा थरकाप उडवणारा अपघात चौकात लावण्यात आलेल्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या दरम्यान अतिशय थरारक असा हा अपघात झाला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आजारी असतानाही गाडी चालवली

या अपघातातील कार चालक असलेले वसंत चव्हाण हे आजारी असल्याची माहिती समोर आली आहे. कारचे चालक वसंत चव्हाण यांच्या नातेवाईकांची पोलीस चौकशी करत असून त्यांना कोणता आजार होता का याची देखील तपासणी पोलीस करत आहेत. या अपघातातील जखमींना कोल्हापुरातील खाजगी रुग्णालय त्याचबरोबर सीपीआर रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. या अपघाताची थरारक दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अतिशय अचूकपणे कैद झाले आहेत.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> इंजेक्शन देताना चिमुकला डॉक्टरांना असं काही बोलला की…VIDEO पाहून तुम्हीही पोट दुखेपर्यंत हसाल

सोशल मीडियावर दररोज अपघातांशी संबंधित व्हिडीओ शेअर केले जातात. ज्यातील काही व्हिडीओ पाहिल्यानंतर सर्वांनाच धक्का बसतो. हे अपघात टाळण्यासाठी एकच उपाय आहे, तुम्ही सदैव सावध राहा. @priyarajputlive नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हि़डीओ पोस्ट करण्यात आला असून, या व्हिडीओला लोक वारंवार पाहात आहेत. तसेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

Story img Loader