Kolhapur Halagi Dance Video Viral: कोणतंही काम सोपं नसतं. मात्र तर इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काम सोपं नक्कीच होतं. एक काळ असा होता, जेव्हा डान्स करणारी किंवा गाणं गाणारी लहान मुलं फार कमी दिसायची. मात्र आता सोशल मीडियाच्या वाढत्या वापरासोबतच लहान मुलांचे असे अनेक व्हिडिओही पाहायला मिळतात. ही चिमुकली मुलं आपल्या टॅलेंटने सर्वांनाच हैराण करतात. आजकाल तर अगदी लहान मुलंही डान्स करताना दिसतात. सध्या एका अशाच कोल्हापूरमधील दोन चिमुकल्यांचा हालगीच्या तालावरील डान्स तुफान व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही या चिमुकल्यांच्या टॅलेंटचं कौतुक कराल.

कोल्हापूर म्हटलं की, डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुसलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता कोल्हापूरातील हुपरीच्या एका सहा वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. ज्यामध्ये तो हालगीवर ठेका धरताना दिसत आहे.या चिमुकल्याच्या व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेकजन त्याचे कौतुक करत आहेत. इतकेच नव्हे तर हातकलंगलेचे आमदार राजू आवळे यांनीही हा व्हिडिओ एक्सवर पोस्ट केला आहे.

interest and curiosity while making a documentary
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : आस्था आणि कुतूहलासाठी…
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Nagpur, Thieves stole donation box Mahal,
साक्षात ‘विघ्नहर्ता’ मंडपात, तरीही चोरट्यांनी साधला डाव
Ganesh Mandals, Satara, Lawsuits Satara,
सातारा : ध्वनिमर्यादा ओलांडणाऱ्या २९ गणेश मंडळांवर खटले
chhatrapati sambhaji raje slams of dhananjay munde for busy in cultural events
शेतकरी अतिवृष्टीने उध्वस्त झालेला असताना कृषीमंत्री परळीच्या सांस्कृतिक कार्यक्रमात मग्न, छत्रपती संभाजीराजे यांची धनंजय मुंडे यांच्यावर टीका
Kaustubh Pandharipande faces a big challenge of kidney disease
नागपूर : माळरानाच्या संवर्धकासमोर किडनी आजाराचे मोठे आव्हान
Solapur crime news
लातूरच्या अल्पवयीन मुलीस जन्मदात्या आईनेच विकून लग्न लावले, माढ्यातील धक्कादायक प्रकार
shiye kolhapur news, Shiye village bandh,
कोल्हापूर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीला फाशी द्यावी; शिये गाव बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

कोण आहे हा चिमुकला?

व्हायरल व्हिडिओमध्ये हलगीच्या ठेक्यावर बेधुंदपणे नाचणाऱ्या चिमुकल्याचे नाव कृष्णा वाईंगडे असे असून तो कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी या गावचा आहे. हुपरीमध्ये नुकतेच एका तरुणाची पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाली आहे. यानिमित्ताने त्याच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला हलगीच्या ठेक्यावर नाचत अनेक तरुणांनी गुलालाची उधळन केली. याचवेळी कुणीतरी सहा वर्षाच्या कृष्णाला गुलाल लावला. कृष्णाने देखील बेधुंदपणे हलगीवर ठेका धरला. हलगीच्या ठेक्यावर ताल धरणाऱ्या कृष्णाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आह

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “जीव एवढा स्वस्त असतो का रे?” फेमस होण्यासाठी तरुणांनी काय केलं पाहा; VIDEO पाहून अंगावर येईल काटा

हा व्हिडीओ सोशल मीडियावर नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला असून व्हिडीओला पश्चिम महाराष्ट्रात पोरं दगडावर दगड आपटलं तरी बद्द्या नाचत्यात..ही तर ‘हलगी’ हाय.. असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत असून व्हिडीओनं नेटकऱ्यांचही मन जिंकलं आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.

एकच नंबर, कोल्हापूर म्हणजे विषय हार्ड ओ…, फुल ऑन राडा ना…पोरगा ऐकत नाय, अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.