Kolhapur Rain News: महाराष्ट्रात सध्या सगळीकडेच मुसळधार पाऊस सुरू आहे. कोल्हापुरातदेखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पावसामुळे अनेक समस्या निर्माण होतायत. कोल्हापुरात आता २०१९ आणि २०२१ सालासारखी पूरस्थिती निर्माण होतेय की काय असा प्रश्न निर्माण होतोय. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक मार्ग बंद झालेत. कोल्हापूर-रत्नागिरी, कोल्हापूर-गगनबावडा हे राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेत. अशातच कोल्हापूरमधला एक व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. कोल्हापूरमध्ये एका नदीमधला हा व्हिडीओ असून हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तुम्हीच पाहा या व्हिडीओमध्ये असं नेमकं आहे तरी काय?

कोल्हापूरमध्ये सकाळपासून हा व्हिडीओ व्हायरल होत असून सर्वत्र याच व्हिडीओची चर्चा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असले की, या व्हिडीओमध्ये नेमकं आहे तरी काय? तर झालं असं की, काही गावकरी पुराच्या पाण्यात चढणीचे मासे पकडत होते. त्यावेळी त्यांच्या जाळ्यामध्ये हा भलामोठा मासा अडकला. गावकऱ्यांनी कशाप्रकारे या माशाला बाहेर काढलं हे तुम्ही या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहू शकता. या माशानं जवळपास ५ ते १० फूट उंच उडी मारली होती. पण, जाळ्यातून बाहेर पडणं त्याला शक्य झालं नाही आणि अखेर जाळं तोडण्याच्या नादात त्याचा मृत्यू झाला. हा मासा नेमका कुठून आला, याबद्दल अद्याप कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पण, हा मासा पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> पुण्यात पावसाचा हाहाकार! टिळक पूल पाण्याखाली तर पुराच्या पाण्यात मधोमध अडकली कार, थरारक VIDEO तुफान व्हायरल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर journalist.ajay_25 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओवर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावेळी एकानं म्हटलं आहे की, कशाला त्याचा जीव घ्यायचा? तर आणखी एकानं लिहलंय की, निष्पाप बळी घेतला.

पुणे-बंगळूर महामार्गावर पाणी येण्याची शक्यता?

कोल्हापूरकरांच्या २०१९ आणि २०२१ मधील आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यामुळे पंचगंगा नदी धोका पातळीकडे गेल्याने पुणे-बंगळुरू महामार्गावर पाणी येणार का? अशी भीती निर्माण झाली आहे.

कोल्हापुरात वॉर रूम सुरू

पंचगंगा नदी इशारा पातळी गाठत असल्याने कोल्हापूर महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील स्थायी समिती सभागृहात सेंट्रल वॉररूम आजपासून सुरू करण्यात आली आहे. महापालिकेने यापूर्वी अग्निशमन विभाग, चारही विभागीय कार्यालयांमध्ये आपत्तीच्या काळात व्यवस्थापनेसाठी व पूर परिस्थितीच्या काळात नागरिकांच्या सोईसाठी मदत कक्ष सुरू केले आहे. पुराच्या कालावधीमध्ये येथे संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी केले आहे.