Kolhapur Video : कोल्हापूर शहर हे महाराष्ट्रातील अतिशय लोकप्रिय शहर आहे. हे शहर हस्तकलेसाठी म्हणजेच कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी साज नावाच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. या शहराला प्रचंड मोठा इतिहास लाभला आहे. येथील प्राचीन मंदिरे आणि ऐतिहासिक वास्तू या शहराची ओळख सांगतात. महालक्ष्मी मंदिर, कुस्ती, तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापूरी गूळ आणि येथील काही ठिकाणे विशेष प्रसिद्ध आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या शहराविषयी सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. लोक या शहराविषयी विविध प्रकारची माहिती सोशल मीडियावर शेअर करतात.असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये कोल्हापूर शहरातील तीन प्रसिद्ध मंदिराविषयी सांगितले आहे. आज आपण त्याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत. (Kolhapur video do you see three famous temples in Kolhapur watch viral video)

हेही वाचा : ‘आईला नाव सांगीन तुझं… ‘ घोड्यावर बसलेला मुलगा आला रडकुंडीला; VIDEO पाहून पोट धरून हसाल

व्हिडिओत काय सांगितले?

या व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितल्याप्रमाणे –
कोल्हापूर जाणार असाल तर ही ३ मंदिरे पाहायला विसरू नका.
१. श्री अंबाबाई मंदिर
२. ज्योतिबा मंदिर
३. कोपेश्वर मंदिर

या व्हिडीओमध्ये या तीनही मंदिराचा सुंदर परिसर दाखवला आहे. या मंदिराचा परिसर पाहून तुम्हालाही या मंदिरांना भेट द्यावीशी वाटेल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : “अरे हिम्मतच कशी होते?” भर गर्दीत तरुणानं महिला पोलिसांबरोबर काय केलं पाहा; VIDEO पाहून तुम्हीच सांगा नेमकं कोण चुकलं?

पाहा व्हायरल व्हिडीओ (Watch Viral Video)

हेही वाचा : बापरे! रशी समजून चिमुकल्यानं पकडला साप अन् केलं असं काही… VIDEO पाहून नेटकरी झाले शॉक

bhukkad_girl_ या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कोल्हापुरातील तुमच आवडतं ठिकाण कोणत??” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “जगात भारी आम्ही कोल्हापुरी” तर एका युजरने लिहिलेय, “श्री करवीर निवासिनी आई महालक्ष्मी,श्री जोतिर्लिंग, बाळूमामा मंदिर आदमापूर, खिद्रापूर खोपेश्वर मंदिर, श्री विठ्ठल बिरदेव मंदिर ,पट्टणकोंडोली, श्री हालसिद्धनाथ, आप्पाचीवाडी हे सर्व कोल्हापूर जिह्यातील प्रसिद्ध व जागृत देवस्थान आहेत.” आणखी एका युजरने लिहिलेय, “कोल्हापूरला येणारे या तीन मंदिरात दर्शन घेण्यासाठीच तर येतात….” अनेक युजर्सनी हे तीन ही मंदिरे अतिशय सुंदर असल्याचे सांगितले आहेत. काही युजर्सनी ‘नृसिंहवाडी मंदिरा’ला सुद्धा भेट देण्यास सुचविले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapur video do you see three famous temples in kolhapur watch viral video ndj