Kolhapur Video : कोल्हापूर आपल्या राज्यातील एक असं शहर जे बऱ्याच गोष्टींसाठी लोकप्रिय आहे. कुस्ती,तांबडा पांढरा रस्सा, कोल्हापुरी साज, कोल्हापुरी चप्पल, आई अंबाबाईचे मंदिर, ज्योतिबा, पन्हाळा, रंकाळा, राधानगरी धरण, गूळ, येथील बोलीभाषा आणि बरंच काही प्रसिद्ध आहे. श्रृंगार, खाद्य संस्कृती, देवस्थाने, गडकिल्ले, जलाशये, आणि ऐतिहासिक वास्तूंनी परिपूर्ण हे शहर आजही मोठ्या दिमाखात उभे आहे.

आज कोल्हापूर शहराने खूप प्रगती केली. नवीन बांधकाम, नवीन रस्त्यांमुळे शहराचे चित्र बदलले पण तुम्हाला जुने कोल्हापूर कसे दिसत होते, हे माहितीये का? सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जु्न्या कोल्हापुरचे काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो पाहून अनेकांच्या डोळ्यांसमोर आठवणीतले कोल्हापूर येतील. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. (Kolhapur video : old photos of kolhapur)

Chhaava Movie New Release Date
तारीख ठरली! ‘या’ दिवशी प्रदर्शित होणार बहुप्रतीक्षित ‘छावा’ चित्रपट; विकी कौशल म्हणाला, “३४४ वर्षांनंतर…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
bollywood actors went to kareena home to meet her and kids
Video : सैफला भेटून बहिणीचे डोळे पाणावले! करण जोहर, रणबीरसह ‘हे’ बॉलीवूड कलाकार पोहोचले करीनाच्या भेटीला
Aakhil bharatiya chitrapat mahamandal meeting held peacefully Kolhapur news
कोल्हापूर: चित्रपट महामंडळाची बैठक खेळीमेळीत झाल्याचा दावा; बाहेर गोंधळ आत शांतता
Video : Which is the most beautiful beach in Maharashtra
Video : महाराष्ट्रातील सर्वात सुंदर समुद्र किनारा कोणता? व्हिडीओ होतोय व्हायरल, नेटकरी म्हणाले, “महाराष्ट्रीयन असल्याचा अभिमान आहे”
Marathi Actor Visited Maha Kumbh Mela 2025
“प्रयागराजच्या पवित्र भूमीवर…”, महाकुंभ मेळ्याला पोहोचला ‘हा’ मराठमोळा अभिनेता; नेटकरी म्हणाले, “भाग्यवान आहेस…”
virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
jijau Jayant 2025
जिजाऊंच्या जयघोषाने मातृतीर्थ दुमदुमले, सिंदखेडराजात पाऊण लाख शिवभक्त

कोल्हापुरचे दुर्मिळ फोटो

या व्हायरल व्हिडीओमध्ये कोल्हापुरातील काही दूर्मिळ अन् जुने फोटो दाखवले आहेत. व्हिडीओ पाहून तु्म्हाला जुने कोल्हापूर कसे दिसत होते, याचा अंदाज येईल. या व्हिडीओमध्ये कोल्हापूरच्या विविध लोकप्रिय ठिकाणांचे फोटो दिसत आहे. सुरुवातीला तुम्हाला कोल्हापुरच्या रेल्वे स्टेशनवरील फोटो दिसेल. जुने रेल्वे स्टेशन पाहून तुम्हीही थक्क व्हाल. त्यानंतर पुढे शिवाजी पूलावरील फोटो दिसेल. त्यानंतर पंचगंगा घाट दिसेल.

व्हिडीओत पुढे महालक्ष्मीचा दू्र्मिळ फोटो दिसेल. कोल्हापुरातील लोकप्रिय सीपीआर हॉस्पिटलचा तुम्हाला जुना फोटो दिसेल. जुना रंकाळा तलाव कसा दिसतोय, हे तुम्हाला या व्हिडीओ दिसून येईल. टाऊन हॉल संग्रहालयाचा जुना फोटो सुद्धा तुम्हाला यामध्ये दिसून येईल. त्यानंतर तुम्हाला कोपेश्वर मंदिराचा सुद्धा जुना फोटो दिसेल. पन्हाळा किल्ला, भवानी मंडप, न्यु पॅलेस, राजाराम हायस्कूल आणि महालक्ष्मी मंदिराचा सुद्धा फोटो या व्हिडीओमध्ये दिसेल. व्हिडीओतील कोल्हापूरचे हे जुने फोटो पाहून कोणीही थक्क होईल. काही लोकांना जुने दिवस आठवतील.

हेही वाचा : VIDEO : चालत्या बसमध्ये पॅन्टच्या खिशातून चोरला फोन, दिल्लीच्या DTC बसमधील व्हिडीओ व्हायरल

पाहा व्हायरल व्हिडीओ

kolhapur_smart_city या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आठवणीतले कोल्हापूर..” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “मला कोल्हापूर खूप आवडते. खूप गोड आठवणी आहेत” अनेक युजर्सनी व्हिडीओ पाहून हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.

Story img Loader