Viral Video : नुकताच गणेशोत्सव देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. गणेशोत्सव दरम्यानचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या गणपतीसमोर भन्नाट डान्स करणाऱ्या एका आजीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये आजी तुफान डान्स करताना दिसत आहे.
आजीचा डान्स व्हिडीओ पाहून तुम्हाला वाटेल की आयुष्यात माणसाने मनसोक्त जगणे, आवश्यक आहे आणि या आजीसारखा प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यावा.
हा व्हायरल व्हिडीओ गणपती उत्सवातील आहे. गणेश तरुण मंडळाच्या गणपतीसमोर आजी काही तरुणांबरोबर मनसोक्त डान्स करताना दिसत आहे. साध्या भोळ्या आजीच्या डान्स स्टेप्स आणि हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
कपाळावर लाल कुंकू आणि नऊवारी नेसलेल्या या आजीला पाहून कदाचित तुम्हाला तुमच्या आजीची आठवण येईल. हा व्हायरल व्हिडीओ कोल्हापूर शहरातील आहे.
हेही वाचा : VIDEO : सेम टू सेम मिथुन चक्रवर्तीसारखा दिसतोय? व्हिडीओ पाहून तुम्हीही चक्रावाल
bagha_aaba या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “जगणं मनसोक्त पाहिजे..!!”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “नाद पाहिजे फक्त नादापुढं वय काहीच नाही” तर एका युजरने लिहिलेय, ” या आज्जीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे नवरात्रीमध्ये आई महालक्ष्मीची पालखी जेव्हा असते त्यावेळी घाटी दरवाजाजवळ या आज्जीचा उदो उदो आवाज नक्की ऐकावा”