Kolhapur viral video: कोणतंही काम सोपं नसतं, मात्र इच्छाशक्ती प्रबळ असेल तर काम सोपं नक्कीच होतं. कोल्हापूर म्हटलं की डोळ्यासमोर येतात रांगडी अन् मनमौजी लोकं. आपल्या दिलखुलास वागण्यासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूरकर कायमच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असतात. आता कोल्हापुरातील एका चौकातला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही म्हणाल, भरचौकात हे असं चित्र एकाच शहरात दिसू शकतं, ते म्हणजे कोल्हापूर. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही कोल्हापूरकरांचे कौतुक कराल.

प्रत्येक भारतीय घरामध्ये दूध हा पदार्थ नानाविध कारणांसाठी वापरला जातो. लहान मुलांपासून ते वयस्कर माणसांपर्यंत सर्वांच्या आहारामध्ये दुधाचा समावेश असतो. दुधाचे सेवन करणे शारीरिक वाढीसाठी फायदेशीर असते. यामध्ये असलेल्या पौष्टिक घटकांमुळे लहान मुलांना सतत दूध पाजले जाते. दही, लोणी असे पदार्थ दुधापासून बनवले जातात. याशिवाय चहा, कॉफी, मिठाई बनवतानाही दुधाचा प्रामुख्याने वापर केला जातो. दैनंदिन आयुष्यामध्ये आवश्यक असलेल्या या पदार्थामध्ये लोक भेसळ करत असतात. अशा भेसळयुक्त दुधाचे सेवन केल्याने किंवा दुधापासून बनवलेले पदार्थ खाल्ल्याने शरीराला अपाय होऊ शकतो. हा त्रास होऊ नये यासाठीच कोल्हापूरमध्ये भर चौकात थेट म्हशीचं समोरा-समोर दूध काढून ग्राहकांना विकलं जातंय.

Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
car accident video | car hits woman distracted by phone
थरारक अपघात! भरधाव कारच्या धडकेत तरुणी हवेत उडून रस्त्यावर आदळली अन् नंतर केलं असं काही की…; VIDEO पाहून बसेल धक्का
Reason behind keeping name of bungalow asshare marketchi krupa in badlapur photo goes viral
आई-वडिलांची नाही तर ‘या’ गोष्टीची कृपा म्हणत पठ्ठ्यानं घराला दिलं भन्नाट नाव; PHOTO एकदा पाहाच
Kolhapur video Rankala Lake
“कोल्हापूरकरांसाठी सुखाचं एक ठिकाण म्हणजे…” कोल्हापूरातील लोकप्रिय ठिकाणचा VIDEO होतोय व्हायरल
cases have been registered by the police against those selling food on handcarts by blocking roads and footpaths In Kalyan
कल्याणमध्ये रस्ते, पदपथ अडवून हातगाडीवर खाद्यपदार्थ विकणाऱ्यांवर पोलिसांकडून गुन्हे
Dance Viral Video
‘डान्स असावा तर असा…’; ‘चढ़ती जवानी मेरी चाल मस्तानी’ गाण्यावर चिमुकलीचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून नेटकरीही झाले अवाक्
a young man paati goes viral on social media
“..तेव्हाच मंदिरातील माऊली प्रसन्न होईल” तरुणाची पाटी चर्चेत, VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ आहे कोल्हापुरातील दूध कट्ट्यावरचा. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, कोल्हापूरमध्ये भरचौकात म्हस आणून लोकांनी ग्राहकांच्या समोरच म्हशीचं दूध काढत आहेत. कोणतीही भेसळ नाही, फसवणूक नाही; तर ग्राहकांच्या समोरच हे दूध काढून ग्राहकांना विकलं जातं आहे. अनेकदा दुधामध्ये पाणी मिक्स करून ग्राहकांची फसवणूक केली जाते, मात्र इथे ग्राहकांसमोरच म्हशीचं ताजं दूध काढून दिलं जातंय. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यामुळेचं ग्राहकांनी रस्त्यावर दुधाच्या किटल्या ठेवून रांग लावली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “आमच्यावेळी असे शिक्षक हवे होते” गणित शिकवण्याचा शिक्षकाचा अनोखा फंडा; VIDEO मधली ट्रिक बघून व्हाल हैराण!

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर हा व्हिडीओ @prashantkadam नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “भरचौकात हे असं मस्त, निवांत चित्र एकाच शहरात दिसू शकतं…, पुरेपूर कोल्हापूर. शुद्ध, विनाभेसळीच्या परंपरा तशा माणसांच्या शहरातच टिकू शकतात ना; दूध कट्टा!” असं कॅप्शन व्हिडीओला दिलं आहे. नेटकरीही यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत, “दुर्मीळ होत चाललंय आता, कोल्हापूर म्हणजे नादखुळा, फेस आलेलं ताजं ताजं दूध पिणं एकदातरी आवर्जून अनुभवावं ते कोल्हापुरातील दूध कट्ट्यावर अवर्णनीय आनंद”, अशा अनेक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.