Viral video: सध्या मुलांच्या लग्नाचा विषय फारच गंभीर होत चाललाय. हल्ली मुलांना मुली मिळणं कठीण झालंय. स्वभाव, कुटुंब व अनुरूपता न पाहता शेती-नोकरी, पगार, गाडी, स्वतःचं घर आणि कुटुंबातील कमी सदस्यसंख्या यावरच हल्ली लग्न ठरत असतात. नणंद, दीर नको, सासू-सासऱ्यांपासून नवरा वेगळा हवा, त्याचा पुण्या-मुंबईत फ्लॅट हवा, अशा अपेक्षा सध्या मुलींसह पालकांकडून व्यक्त होत आहेत. ‘असलाच नवरा पाहिजे हं…’ अशा मानसिकतेच्या मुलींमुळे अनेक मुले लग्नाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, अशाच एका वैतागलेल्या कोल्हापुरी तरुणाला लग्नासाठी मुलगी कशी पाहिजे असं विचारलं असता त्यानं जे उत्तर दिलंय ते ऐकून तुम्हीही पोट धरून हसाल. याचा व्हिडीओही आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

लग्नासाठी मुलाकडून प्रचंड अपेक्षा करणाऱ्या मुलींना या कोल्हापूरच्या तरुणानं कोल्हापुरी शैलीत उत्तर दिलंय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, पाच-सहा तरुण स्टेजवर उभे आहेत. यावेळी एक जण त्यातल्या एका तरुणाला लग्नाच्या काय अपेक्षा आहेत असा प्रश्न विचारतो. यावर हा तरुण उत्तर देतो, “आमच्या अपेक्षा भंग झाल्या आहेत, वय ३५ आणि कोण करून घेणार आम्हाला? यांना ५० हजार पगारवाला ७० हजार पगारवाला पाहिजे, गाड्या पाहिजे, सगळं पाहिजे; कुठून आणायचं सगळं? सरकारी नवरा म्हणत काळे नवरे करून घेतात. आम्हाला साधं, चांगलं, कसंबी असूद्या आम्ही करतो आणि निवांत आम्ही सुखाचा संसार करतो..संपला विषय..” पुढे तरुणाला प्रश्न विचारतात, दुचाकी-चारचाकी हवीय का? यावर तरुण म्हणतो, “काहीच अपेक्षा नाही, आमची लुना गाडी हाय मीच देतो तिला.. बास.”

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “अशी पिढी पुन्हा होणे नाही” डोक्यावरचा पदर खाली पडू न देता आजीबाईंचा पारंपारिक नाच; VIDEO पाहून कराल कौतुक

जो तरुण पुण्या-मुंबईसारख्या शहरात नोकरीला आहे, अशा तरुणांना आपली मुलगी द्यावी असं लोकांना वाटू लागले आहे. विवाहाची जबाबदारी पडण्यापूर्वी करिअर घडविणे हल्लीच्या मुला-मुलींना योग्य वाटते. मग शिक्षण, नोकरी, स्पर्धा परीक्षांच्या नादात त्यांच्याही नकळत विवाहयोग्य वय वाढत जाते. नोकरी मिळाल्यानंतरही तीत स्थैर्य हवे, अशा अपेक्षेने काही मुले स्वतःच उशिरा बोहल्यावर चढतात.

हा व्हिडीओ सोशल मीडियावर mhpattern नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला असून तो आता तुफान व्हायरल होत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kolhapuri boy talk about girls demanding for marriage funny video goes viral on social media srk