कोकण किनारपट्टीवर राज्य करणारा आगरी आणि कोळी समाज. या दोन्ही समाजाचा प्रमुख व्यवसाय हा मासेमारी करणे आहे. प्रचंड कष्ट करून जगणारी स्वभावाने भोळी असणारी हि माणसं मात्र त्यांच्या स्त्रिया अंगभर सोने परिधान केलेल्या दिसतात. अगदी मासे विकायला आलेल्या कोळिणी अंगभर सोन्याने मढलेल्या आढळतात. गळ्यात साखळी कोणाची ही पोरगी कोणाची या प्रश्नाचं हमखास उत्तर कोळी आणि आगरी असं येत असत. अशाच एका कोळीण बायचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या कोळीण बायच्या गळ्यात चक्क खेकड्याचं लॉकेट आहे. आता तुम्ही म्हणाल त्यात काय एवढं…तर हे लॉकेट साधंसुधं नसून तब्बल ८ तोळे सोन्याचं आहे.
लोकांचं जीवन समुद्रावर चालते. समुद्रातून पकडलेले मासे म्हणजे त्यांचे आयुष्य समुद्र म्हणजे त्यांची शेती. पकडलेले मासे भाऊच्या धक्क्यावर किंवा खुलदाबाद येथे विकायचे आणि त्यातून आपला रोजगार निर्माण करायचा. हा त्यांचा दिनक्रम.कोळी आगरी समाजातील पुरुष मासे पकडण्यासाठी खोल दर्यात जातात. ते कित्येकदा पंधरा-पंधरा दिवस समुद्रात असतात. त्यामुळे पूर्वापार घराची मुख्य जबाबदारी ही महिलाच सांभाळत आल्या. पुरुषाने पकडलेले मासे साफ करणे आणि बाजारात विकणे हा मुख्यतः कोळी महिलांचा व्यवसाय.कोळी लोकांच्या श्रीमंतीची चर्चा आपण एकली आहे मात्र त्यामागची प्रटंड मेहनत आपल्याला ठाऊक नसते. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, या मावशी गळाभर सोनं घालून मासे विकत आहेत. यावेळी त्यांच्याकडे मासे खरेदीसाठी आलेल्या एका तरुणानं त्यांचा व्हिडीओ बनवला आहे तो व्हायरल झाला. खरंच मावशींच्या गळ्यातील सोन्याचा खेकडा सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> जंगलाची राणी सिंहीणीला भिडणारे हे प्राणी कोण? घेरून केला जबर हल्ला; पण शेवटी आला वेगळाच ट्विस्ट, VIDEO पाहाच
हा व्हिडीओ ajaymumbaivlogs या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत असून व्हिडीओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. एका युजरने कमेंट केली “लय भारी”, तर दुसरा म्हणतो “झकास चिंबोरी”.