Kolkata Doctors Rape Murder Case : लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर प्रसारित होत असल्याचे आढळले. हा व्हिडीओ कोलकाता बलात्कार-हत्येतील पीडितेच्या आईचा असल्याचा दावा करण्यात येते आहे. पण, खरंच हा व्हिडीओ कोलकाता बलात्कार हत्येतील पीडितेच्या आईचा आहे का, याबाबतचा तपास आम्ही सुरू केला. यावेळी फोटोमागचं एक वेगळं सत्य समोर आलं आहे, ते काय आहे आपण जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
X युजर Simranjeet Kaur ने व्हिडीओच्या स्क्रीनशॉटचा फोटो आपल्या अकाउंटवरून शेअर केला आहे.
इतर वापरकर्तेदेखील स्क्रीनशॉट किंवा व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास :
आम्ही व्हिडीओमधून मिळवलेल्या किफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून आमचा तपास सुरू केला.
यामुळे आम्हाला एक YouTube शॉर्ट मिळाले, ज्यामध्ये त्याच व्हिडीओवर दुसऱ्या मुलीचा फोटो होता आणि व्हिडीओने सुचवले की, व्हिडीओमधील महिला तिशाची आई आहे.
त्यानंतर आम्ही गूगल किवर्ड सर्च केले.
आम्हाला Movie Telly च्या यूट्यूब चॅनेलवर असाच व्हिडीओ सापडला.
एक महिन्याआधी अपलोड केलेल्या या व्हिडीओचे शीर्षक होते : Tishaa Kumar Mother Tanya Singgh Heart Melting Video at Daughter’s Funeral
आम्हाला Watch Bollywood नावाच्या यूट्यूब चॅनेलवरदेखील हा व्हिडीओ सापडला.
आम्हाला या बाबतीत काही बातम्यादेखील सापडल्या.
बातम्यांमध्ये नमूद केले आहे : टी-सीरिजचे सह-मालक कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमार हिचे कर्करोगाशी दीर्घकाळ लढाईनंतर वयाच्या २० व्या वर्षी १८ जुलै २०२४ रोजी निधन झाले. अभिनेता-निर्माता कृष्ण कुमार सोमवारी मुंबईत त्यांची मुलगी तिशा कुमारच्या अंत्यसंस्कारावेळी खूप भावूक झालेले दिसले.
भूषण कुमार यांची चुलत बहीण तिशा कुमार हिचे १८ जुलै रोजी निधन झाले. तिचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी मुंबईत आणण्यात आले, यावेळी तिचे वडील कृष्ण ऑनलाइन समोर आलेल्या एका व्हिडीओमध्ये दिसले. यावेळी तिशाची आई तान्या कुमारही तिथे दिसून आली. अंत्यसंस्कारात सहभागी होत असताना त्यांनाही अश्रू आवरणे अवघड होत होते. यावेळी भूषणदेखील तिथे उपस्थित होते. यावेळी त्यांनी कुटुंबाप्रती कठीण काळातून सावरण्यासाठी आवश्यक पाठिंबा आणि प्रेम व्यक्त केले.
निष्कर्ष : तिशा कुमारची आई तान्या सिंग, त्यांच्या मुलीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी भावूक झालेला एक व्हिडीओ (तिशाचे कर्करोगाशी दीर्घकाळ लढाईनंतर दुःखद निधन झाले) भ्रामक दाव्यांसह शेअर केला जात आहे. तपासादरम्यान आम्हाला आढळले की, व्हिडीओ अभिनेता निर्माता कृष्ण कुमार यांची मुलगी तिशा कुमारच्या आई तान्या सिंगचा आहे, जो कोलकाता बलात्कार आणि खून पीडितेच्या आईचा असल्याचा सांगून व्हायरल होतो आहे, पण हे व्हायरल दावे दिशाभूल करणारे आणि खोटे आहेत.