काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमध्ये एका महिलेली भर चौकात छेड काढण्यात आली होती. तिने याचा विरोध केला असता तिला मारहाण झाली ही घटना ताजी असतानाच कोलकातामध्येही मुलीला अशाच प्रसंगाला समोरे जावे लागले. ख्रिसमस साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबासोबत एका हॉटेलमध्ये ही तरुणी गेली होती. तिथे असलेल्या एका माणसांने तिची छेड काढण्याचा प्रयत्न केला. याची तक्रार करताच त्या माणसाला हॉटेलमधून बाहेर काढण्याऐवजी हॉटेल मॅनेजरने त्या मुलीलाच हॉटेलमधून बाहेर काढले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

VIDEO : दोस्त असावा तर असा! तिच्यासाठी दोन दिवस तो रेल्वेरुळावर बसून होता

कोलकातामध्ये राहणारी २६ वर्षांची तरूणी विजया दास आपल्या कुटुंबियांसोबत शेर- ए- पंजाब नावाच्या हॉटेलमध्ये आली होती. पण याचवेळी तिला खूप वाईट अनुभव आला. या हॉलेटमधला एक व्यक्ती तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता सुरूवातीला विजयाने त्याकडे दुर्लक्ष केले. पण नंतर हा सारा प्रकार असह्य होऊ लागल्याने तिने हॉटेलच्या मॅनेजरकडे तक्रार केली. पण तिला मदत करण्याऐवजी या मॅनेजरने तिला आणि तिच्या कुटुंबियांनाच हॉटेलमधून बाहेर काढले. हा संपूर्ण वाईट अनुभव तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याचा व्हिडिओही तिने शेअर केला आहे. आज स्त्री हक्काच्या आणि स्त्री समानतेच्या बाता केल्या जातात पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती बदलेली नाही त्यामुळे आता तिने समाजाकडे न्याय मागितला आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील एका महिलेचीही भररस्त्यात छेड काढण्यात आली होती. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आपल्याला न्याय मिळाला नाही तर आत्महत्या करू अशी धमकीही तिने पोलिस स्टेशनमध्ये दिली होती.

Story img Loader