Kolkata model at Durga Puja Pandal: पश्चिम बंगालमध्ये नवरात्रौत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दुर्गा पूजेनिमित्त विविध सार्वजनिक मंडळे आकर्षक देखावा निर्माण करत असतात. बॉलिवूडमधील सेलिब्रिटीही या दुर्गा पूजेला अनेकदा उपस्थिती लावताना दिसतात. दुर्गा पूजेनिमित्त एकाबाजूला सेलिब्रिटी बंगाली पद्धतीने साडी नेसून जात असताना काही मॉडेल्सनी मॉडर्न कपडे घालून दुर्गा मंडळात अंगप्रदर्शन केल्यामुळे आता वाद उद्भवला आहे. तीन मॉडेल्सनी अतिशय तोकडे कपडे घालून दुर्गा पूजा मंडळाला भेट दिली होती. हेमोश्री भद्रा नावाच्या मॉडेलवर यानिमित्ताने आता टीका होत आहे. ती स्वतःला “मिस कोलकाता २०१६” ची विजेता असल्याचे सांगते. तिच्या पेहरावावरून टीका होत असताना तिच्या मैत्रिणीने पुन्हा तोकडे कपडे घालून दुर्गा पूजेला हजेरी लावली. त्याही पोस्टवर आता टीका होत आहे.

काय प्रकार?

हेमोश्री भद्राने तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर सदर फोटो अपलोड केला आहे. यामध्ये तिच्यासह आणखी दोन मॉडेल दिसून येत आहेत. दुसऱ्या मॉडेलचे नाव सन्नती मित्रा असे आहे. मॉडर्न आऊटफिट घालून दुर्गा मंडळात गेल्यामुळे सोशल मीडियाव काही भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. तिघींचेही कपडे असभ्य आणि अश्लील असल्याबद्दल निषेध व्यक्त करण्यात येत आहे. “तुम्हाला हवे तसे कपडे घालण्याचे स्वातंत्र्य आहे. पण देवीच्या मंडपात येताना जरी तरी सभ्यता बाळगा”, अशी कमेंट एका युजरने भद्राच्या पोस्टखाली केली आहे.

हे वाचा >> पुरुष साडी घालून गरबा का खेळत आहेत? काय आहे २०० वर्ष जुनी शेरी गरबा परंपरा?

सन्नती मित्रा हीनेही तिच्या इन्स्टाग्रामवर सदर फोटो अपलोड केला आहे. याबरोबर लिहिलेल्या कॅप्शनमध्ये तिने या कपड्यांचे समर्थन केले आहे. ती म्हणाली, “हे कृत्य बंडखोर होते. हे शक्य होईल, असेही कधी वाटले नव्हते. मुलगी असल्याने आमचे शरीर खराब आहे, असेच आम्हाला वाटत होते. पण आता आम्ही नवीन उदाहरण आणि अनुभव प्रस्थापित करत आहोत.”

या मॉ़डेल्सनी त्यांच्या कृत्याचे समर्थन केले असले तरी सोशल मीडियावर मात्र त्यांच्याशी फार कुणी सहमत नसल्याचे दिसते. अनेक लोकांनी यावर कडाडून टीका केली आहे. “हे फोटो पाहताना अतिशय किळसवाणे वाटत आहे. तुम्हाला लाज कशी वाटली नाही?”, असा प्रश्न एका युजरने विचारला आहे. दुसऱ्या एका युजरने म्हटले, “तुम्ही मांडलेले विचार आणि फोटो यात काही साधर्म्य दिसत नाही. हा काही महिला सशक्तीकरणाचा विषय नाही. तुम्ही सनातन धर्माची थट्टा उडवली आहे. कपडे तर विचित्र घातलेच आहेत. शिवाय तुम्ही सँडल आणि बुट घालून देवीच्या मंडपात कसे काय गेलात?”

सन्नती मित्राकडून दुसरा फोटो पोस्ट

पहिल्या फोटोवरून टीका होत असताच सन्नती मित्राने आज पुन्हा तसाच एक फोटो इन्स्टावर पोस्ट केला आहे. यावेळी ती एकटीच फोटोत दिसत आहे. यावेळी तिने कॅप्शनमध्ये लिहिले की, दैवी शक्तीच्या सान्निध्यात मी परंपरा आणि आधुनिकता या दोन्ही गोष्टींचा स्वीकार करते.”

हे ही वाचा >> Video : ६५ वर्षांच्या काकूंची सूरज चव्हाणला टक्कर; ‘बुक्कीत टेंगुळ’ म्हणत केली जबरदस्त डायलॉगबाजी

या फोटोवरही अनेकांनी टीका केली आहे. तुम्ही फक्त प्रसिद्धी मिळविण्यासाठी हे सर्व करत आहात, असा आरोप नेटिझन्स सन्नती आणि तिच्या मैत्रिणींवर करत आहेत. तसेच दुर्गा पूजा आयोजित करणाऱ्या मंडळाने तरी यांना आत कसे येऊ दिले? असाही प्रश्न काहीजण विचारत आहेत. प्रसिद्धीची लालसा असलेल्या या मॉडेल्सना मंडपात प्रवेश करण्यावर बंदी घातली पाहीजे, असेही काही जणांनी म्हटेल.