आपल्याकडे सार्वजनिक गणेशोत्सवाची मोठी परंपरा आहे. भव्य मुर्ती, देखावे, मोठेमोठे मंडप त्यातून केली जाणारी जनजागृती आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळते. जसा आपल्याइथे गणेशोत्सव थाटामाटात साजरा केला जातो तशीच कोलकातामध्ये दुर्गापूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. यंदा कोलकातामधलं एक दुर्गामंडळ सगळ्यांच्याच आकर्षणाचा विषय ठरत आहे. संतोष मित्र चौकातील दुर्गामंडळाने यावेळी भव्यदिव्य अशा ‘बंकिगहम’ राजवाड्याची प्रतिकृती उभारली आहे. या मंडळाचं यंदाचं ८२वं वर्ष आहे.
Navratri 2017 : विंध्याचल निवासिनिम्
त्याचप्रमाणे दुर्गेसाठी २२ किलो वजनाची सोन्याची साडी तयार करण्यात आली आहे. गेल्या अडीच महिन्यांपासून ही साडी तयार करण्यात येत होती. साडीवर सोनं आणि मौल्यवान खड्यांपासून नक्षीकाम करण्यात आलं आहे. ही साडी विणण्यासाठी आणि तिच्यावर नक्षीकाम करण्यासाठी ५० हून अधिक कारागिरांनी दिवसरात्र मेहनत घेतली आहे. या साडीची किंमत साडेसहा कोटींच्या आसपास आहे. याव्यतिरिक्त मंडळाने लंडन ब्रीज, बिग बेन, बिग आय यांच्याही प्रतिकृती उभारल्या आहेत.