बुधवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आरसीबी आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात झालेल्या एलिमिनेटर सामन्यात एका चाहत्याने मैदानात प्रवेश केला. ही घटना सामान्य नसून याआधीही अनेकदा मैदानावर पाहायला मिळाली होती. मात्र पोलिसांनी ज्याप्रकारे त्या चाहत्याला मैदानाबाहेर नेले आणि त्यानंतर विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली, त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. यामध्ये विराट त्याच्या स्मॅकची अ‍ॅक्शन करून डब्ल्यूडब्ल्यूईच्या रेसलरप्रमाणे रिअ‍ॅक्ट करत आहे.

ही घटना एलिमिनेटर सामन्याच्या शेवटच्या क्षणांची आहे. त्यावेळी आरसीबी मजबूत स्थितीत होता आणि लखनऊ पराभवाच्या जवळ होता. त्याचवेळी एका प्रेक्षकाने स्टँडवरून जमिनीवर उडी मारली आणि सीमारेषेजवळ उभ्या असलेल्या विराट कोहलीच्या दिशेने धावू लागला. त्यातच कोलकाता पोलिसांचा सुरक्षा कर्मचारी मागून आला आणि त्याने त्या तरुणाला खांद्यावर उचलून मैदानाबाहेर नेले. यानंतर विराट कोहलीने दिलेली प्रतिक्रिया व्हायरल होत आहे.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की लीग टप्प्यानंतर, क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर आयोजित करण्यात आला होता. मुंबईतील प्रेक्षक क्षमतेवर बंधने आली होती, मात्र येथे प्रेक्षक कोणत्याही निर्बंधाशिवाय दाखल झाले आणि सुमारे ६० हजारांच्या घरात पोहोचलेल्या या रोमांचक सामन्याचा त्यांनी आनंद लुटला.

Video : अमेरिकेतही पुष्पाची जादू; १३ वर्षांच्या मुलीने व्हॉयलिनवर वाजवलं ‘Oo Antava’

२५ वर्षाच्या मुलीने ६० वर्षाच्या वृद्धासोबत केलं लग्न; लग्नानंतर तरूणीचे दिलेली रिअ‍ॅक्शन व्हायरल

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लखनऊ सुपर जायंट्सचा १४ धावांनी पराभव करत त्यांचा या स्पर्धेतील प्रवास संपवला. या विजयानंतर, बंगळुरूने क्वालिफायर २ मध्ये देखील प्रवेश केला जेथे त्यांचा सामना २७ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सशी होईल. आरसीबी पॉइंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. लीग राऊंडमध्ये संघाने १४ पैकी ८ सामने जिंकले आणि त्यांचे १६ गुण होते. विराट कोहलीने गेल्या मोसमात कर्णधारपद सोडल्यानंतर फॅफ डू प्लेसिसची या हंगामात आरसीबीचा नवा कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Story img Loader