दक्षिण कोलकत्तामध्ये राहणाऱ्या अनिस सरकार ज्याचे वय फक्त तीन वर्ष आणि आठ महिने १९ दिवस आहे, या चिमुकल्याने आतापर्यंतचा सर्वात तरुण बुद्धिबळपटू होण्याचा मान मिळवला आहे. साधरण वर्षभरापूर्वी अनिशने बुद्धिबळ हा खेळ खेळण्यास सुरुवात केली. चिमुकल्याच्या या कौशल्याने उद्योगपती आनंद महिंद्रा यांचे मन जिंकले आहे. आनंद महिंद्रा यांनी नुकतेच या चिमुकल्याचे कौतुक करत सोशल मीडियावर पोस्ट केली आहे.
चिमुकल्याचा व्हिडीओ शेअर करत आनंद महिंद्रा यांनी सांगितले की, अनिश सरकार ज्याचे वय ३ वर्ष आणि ८ महिने आहे तो FIDE-rated सर्वात तरुण बुद्धिबळपटू आहे ज्याला १५५५ इतके रेटिंग मिळाले आहे. वयाच्या ६९ व्या वर्षी मला वाटते की मी १५०० च्या लेव्हलला खेळतो. #IndianChess #AnishSarkarRating.”
ह
u
u
u
u
आनंद महिंद्राच्या व्हिडीओल आतापर्यंत ३,६३,००० व्ह्यूज मिळाले आहे. व्हिडिओने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. एकाने लिहिले की,
भारत हा बुद्धीबळामध्ये वर्चस्व निर्माण करत आहे आणि नेहमीच करत राहील. भविष्य चांगल्या हातांमध्ये आहे.
भारत चेस पावर हॉऊसच्या होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे असे मत दुसर्याने व्यक्त केले.
हेही वाचा – फटाक्यांनी भरलेली पिशवी घेऊन जाताना फुटला सुतळी बॉम्ब, दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; थरारक घटनेचा
२६ जानेवारी २०२१मध्ये रोजी जन्मलेल्या आनिशने वर्षभरापूर्वीच बुद्धीबळ खेळण्यास सुरुवात केली. ऑक्टोबरमध्ये ९ वर्षा खालील पश्चिम बंगालमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेतून त्याने पदार्पण केले. त्याने दोन रेट असलेल्या खेळाडूला मात देत ८ पैकी ५.५ पॉइट मिळवून २४ व्या स्थानी आपले स्थान पटकावले.