सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होऊ शकतो, याचा काही नेम नाही. साहस आणि मनोरंजनाने भरलेले अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर दररोज शेअर होत असतात. असे व्हिडीओ यूजर्स मोठ्या आवडीने पाहणं पसंत करतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून लोक हैराण झाले आहेत. या व्हिडीओमध्ये एका कोमोडो ड्रॅगनने कासवाची केली शिकार आहे. पण त्याची शिकार करण्याची स्टाईल पाहून लोक आश्चर्य झाले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक कोमोडो ड्रॅगन समुद्रातून किनाऱ्यावर येताना दिसत आहे. त्याच्या तोंडात शिकार केलेले कासव दिसत आहे. कासवाची शिकार केल्यानंतर त्याने कासवाचे कवच मोठ्या स्टाईलमध्ये टोपीसारखं आपल्या डोक्यावर ठेवलंय आणि ऐटीत समुद्राबाहेर येत आहे. शिकार केल्यानंतर या कोमोडो ड्रॅगनचा स्वॅग लोकांना आश्चर्य करून सोडणारा ठरला आहे.

कोमोडो ड्रॅगन हे प्रामुख्याने इंडोनेशियाच्या कोमोडो बेटावर आढळतात. याला पृथ्वीवरील सर्वात मोठी पाल देखील म्हणतात. ते १० फूट लांबीचे असतात. या त्यांच्या तोंडात धोकादायक जिवाणू असून ते ज्यांना चावतील त्यांचा मृत्यू निश्चित असतो. अशा परिस्थितीत परिपूर्ण युक्ती वापरत वास घेत ते शिकार शोधतात. ते मोठ्या अस्वल आणि म्हशींना देखील मारू शकतात. काही हत्ती सुद्धा यांचे शिकार बनलेले आहेत. त्यांची शिकार करण्याची पद्धतही वेगळी असते. ते लपून बसतात, शिकार जवळ येताच ते विषारी तोंड उघडतात आणि त्यांना पकडून बसतात. त्यांच्याकडे ६० दात असतात…मग त्यांची शिकार किती भयंकर असू शकते याचा अंदाज लावू शकतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरा नवरीचा हा रोमॅंटिक डान्स एकदा पाहाच!

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : चिल्ड्रन पार्कमध्ये हत्ती घुसला, मग पुढे काय झालं पाहा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ Fascinating नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक तो पुढे सोशल मीडियावरील इतर प्लॅटफॉर्मवर शेअर करू लागले आहेत. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात पाहत असून त्यांची शिकार पाहून हैराण झाले आहेत. लोक या व्हिडीओवर भरभरून प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Komodo dragon eats turtle and wears its shell like a hat old video is viral prp
Show comments