Animal Attack Video: सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही व्हायरल होत असतं. बऱ्याचदा सोशल मीडियावर काही चित्र-विचित्र व्हिडीओ व्हायरल होतात; तर कधी मजेशीर व्हिडीओ व्हायरल होत असतात. या पृथ्वीतलावर निरनिराळ्या प्रकारचे प्राणी राहतात. प्राण्यांच्या हल्ल्यांचे अनेक व्हिडीओ समोर येत असतात. कधी ते माणसांवर हल्ले करतात; तर कधी ते इतर प्राण्यांवर हल्ला करून आपलं पोट भरतात. प्राण्यांच्या लढाईच्या अशा अनेक घटना समोर येत असतात. अशात एका महाकाय कोमोडो ड्रॅगनचा व्हिडीओ समोर आलाय. हा व्हिडीओ पाहिल्यावर तुमच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहणार नाही.

तुम्ही कोमोडो ड्रॅगनविषयी ऐकलं असेल. तुम्ही कधी कोमोडो ड्रॅगनं हरणाच्या बछड्याला खाताना पाहिलं आहे का? तुम्ही हे दृश्य पाहिलं नसेल, तर हा व्हिडीओ तुम्हाला घाबरवेल. समोर आलेले प्रकरण खूप जुनं आहे. नेमकं ठिकाण स्पष्ट झालेलं नाही. परंतु, ३० सेकंदांच्या या व्हायरल व्हिडीओमध्ये, एक कोमोडो ड्रॅगन एका लहान प्राण्याला त्याचं जेवण बनविताना दिसत आहे. हा महाकाय कोमोडो ड्रॅगन जमिनीवर पडलेल्या मृत हरणाच्या बाळाला तोंडानं उचलतो आणि नंतर दोन-तीन घासांत त्याला संपूर्णपणे गिळतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हरणाचा एक मृत बछडा जमिनीवर पडला आहे. तेवढ्यात एक भलामोठा कोमोडो ड्रॅगन तिथे येतो अन् तो केवळ ३० सेकंदांतच त्याला फस्त करतो. हा धक्कादायक क्षण काही लोकांनी कॅमेऱ्यात चित्रित केला; ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवर वेगाने पसरत आहे.

Alone tiger attacks a herd of wild gaur
‘जेव्हा वाघ जगण्यासाठी झटतो…’ एकट्या वाघाचा रानगव्याच्या कळपावर हल्ला; VIDEO पाहून उडेल थरकाप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Fox teasing sleeping lion in jungle see what happened next funny video goes viral on social media
झोपलेल्या सिंहाच्या चक्क शेपटीला चावला कोल्हा; सिंह दचकला अन्…; VIDEO पाहून म्हणाल, “मौत को छूकर टक से वापस आ गया”
Chandrapur District , Junona Ballarpur route, tiger ,
VIDEO : जेव्हा जंगलाचा राजा आला रस्त्यावर…
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
makar sankranti birds emotional video
“पतंग नवीन खरेदी कराल; पण त्यांच्या जीवाचं काय?” मकर संक्रांतीचा ‘हा’ आनंद कोणाला तरी कायमचं दुख देऊन जातोय; पाहा हृदयद्रावक video
Makar Sankranti 2025 Funny video of a kid flying a kite with pants falls down viral video
याला म्हणतात नाद! पँट खाली आली पण पतंग नाही सोडली; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
Snake Fighting With A Mongoose Who Will Win In The Jungle Battle Watch This Viral Video on social media
साप आणि मुंगूसामध्ये रंगलं घनघोर युद्ध, मृत्यूच्या खेळात शेवटी कोणी मारली बाजी? VIDEO पाहून थक्क व्हाल एवढं नक्की

(हे ही वाचा : पाण्यात माशाची चलाख चाल अन् पक्ष्याचा शेवट; माशानं असं काय केलं? पाहा Video )

हा व्हिडीओ सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला जात आहे; तो पाहून शेकडो वापरकर्त्यांनी प्रतिक्रिया दिल्या. हे दृश्य पाहून बहुतेक युजर्स आश्चर्यचकित झाले; तर काहींनी तो डायनासॉरसारखा दिसत असल्याचं सांगितलं.

या प्राण्याचे वजन किती?

कोमोडो ड्रॅगनला कोमोडो मॉनिटर लिझार्डदेखील म्हणतात. ते कोमोडो, रिंका, फ्लोरेस, गिली मोटांग व गिली दसामी या इंडोनेशियन बेटांवर आढळतात. आकारानं सरड्यांची ही सर्वांत मोठी प्रजाती आहे. त्यांची लांबी ३.५ मीटर आणि  ७० किलोपर्यंत याचे वजन असते.

येथे पाहा व्हिडिओ

‘पृथ्वीवरील सर्वात वजनदार कोमोडो ड्रॅगन’

कोमोडो ड्रॅगन ‘पृथ्वीवरील सर्वात वजनदार’ म्हणून ओळखले जातात. ते कधीकधी हरण, डुक्कर, लहान ड्रॅगन आणि अगदी पाणथळ म्हशींची शिकार करतात. या प्राण्याला पाहूनच अनेकांच्या मनात धडकी भरते.

Story img Loader