Viral Video : कोकण म्हणजे स्वर्ग आणि कोकणातील माणसं ही साधी भोळी असतात, असे आपण अनेकदा वाचतो किंवा ऐकतो. कोकणातील निसर्ग पाहून पाहून अनेक जण भारावून जातात. त्यामुळे कोकणात जाणारा प्रत्येक जण कोकणवर भरभरून प्रेम करतो. अनेक पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले कोकण सुंदर निसर्गरम्य स्वर्ग आहे. येथील लोकांचे जेवण, पेहराव, भाषा सर्व आपलीशी वाटतात. कोकणातील संस्कृती आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे.
सोशल मीडियावर कोकणातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहून चक्क कोकणात एकदा तरी जावसं वाटतं.
सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हायरल व्हिडीओमध्ये कोकणातील महिला सुंदर नृत्य सादर करताना दिसत आहे.काही महिलांनी साडी नेसली आहे तर काही महिलांनी नऊवारी नेसली आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा आहे. त्यांचे नृत्य पाहून तुम्हीही भारावून जाल. पारंपारिक कोकणी नृत्य सादर करताना त्या दिसत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा