Video Viral : भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. आपल्या देशात वेगवेगळ्या धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. राज्य, जिल्हा, शहर आणि गावानुसार प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी संस्कृती पाहायला मिळते. कुणाची वेशभूषा वेगळी तर कुणाची खाद्यसंस्कृती वेगळी, कुणाची भाषा वेगळी तर कुणाची कुणाची परंपरा वेगळी, प्रत्येक जण आपआपली संस्कृती जपताना दिसतो. महाराष्ट्रात सुद्धा प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी संस्कृती दिसून येते. नृत्यकला असो वा खाद्यसंस्कृती, भाषा असो वा पेहराव या गोष्टी त्या विशिष्ट भागाची ओळख सांगतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मोठ्या सभागृहात एक तरुण कोकणी डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक मोठे सभागृह दिसेल. या सभागृहात अनेक लोक सुद्धा दिसत आहे. काही लोक बसलेले आहेत तर काही लोक उभे आहेत. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एका तरुणाने सर्वांचे लक्ष त्याच्याकडे वेधून घेतले आहे. हा तरुण खूप सुंदर कोकणी डान्स करताना दिसत आहे. त्याचा डान्स पाहून तुम्हालाही ऊर्जा येईल. काही लोकांना त्याचा पाहून स्वत: डान्स करावासा वाटेल. त्याच्या डान्स स्टेप्स पाहून तुम्हीही थक्क व्हाल. हा तरुण अप्रतिम असा कोकणी डान्स करताना दिसत आहे.
कोकणी नृत्य ही कोकणच्या संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. कोणत्याही शुभकार्यात किंवा लग्नसमारंभात किंवा सणावाराला कोकणी लोक हे कोकणी नृत्य करत आनंद साजरा करतात.
या व्हिडीओवर लिहिलेय, “आपली संस्कृती दाखवायला लाजायचं नाही. अभिमानाने सांगायचं की मी कोकणी आहे.”

हेही वाचा : “बाळांनो आयुष्य म्हणजे खेळ नाही रे” सेल्फी घेण्यासाठी ट्रॅकच्या बाजूला उभा राहिला, पण मागून मृत्यू धावत आला; थरारक VIDEO

पाहा व्हायरल व्हिडीओ

it.is__aapal_kokan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “आम्ही कोकणकर”

हेही वाचा : तुमच्यावर कोण सर्वात जास्त प्रेम करतं? जन्म महिन्यावरून जाणून घ्या, Video होतोय व्हायरल

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “कोंकणी असल्याचा गर्व नाही माज आहे…अभिमान वाटतो भावा तुझा…” तर एका युजरने लिहिलेय, “ही कला असायला सुद्धा नशीब लागतं, कोणाला ही जमतं नाही, जाग्यावर स्वर्ग निर्माण करणं, हे नृत्य सादर करायला अंगात जिद्द व मनामध्ये आवडं लागते. खूप छान झाकडी नाच सादर केलास दादा. अभिमान वाटत आहे.” आणखी एका युजरने लिहिलेय, “हीच ती कला कोकणकरांची कला … जी जन्मतःच प्रत्येक कोकणकरांच्या रक्तात भिनते… आणि तिचा अंत अशक्य आहे … कारण कलाकार जरी गेला तरी त्याची कला ही युगे युगे जिवंत राहते ..” एक युजर लिहितो, “मी कोल्हापूरचा आहे पण मला कोकणातील हा खेळ खूप आवडतो” तर एक युजर लिहितो, “मला अभिमान आहे माझ्या कलेचा”
अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केसे आहेत. काही युजर्सनी या तरुणावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Konkani young guy dance so gracefully video goes viral always our sanskruti or art without hesitation ndj