Viral Video: बटर चिकन आणि समोसे यांसारखे पारंपारिक भारतीय जेवणाला आंतरराष्ट्रीय पातळीवर पसंती मिळेते. याचबरोबर अनेक भारतीय खाद्यपदार्थांची लोकप्रियता जगभरात वाढत आहे. जगभरात भारतीय खाद्यपदार्थांची प्रशंसा होत असल्याने अनेक लोक स्वत:हून विविध खाद्यपदार्थ खाण्यासाठी उत्सूक असल्याचे समोर आले आहे. अनेक कोरियामध्ये राहणारे भारतीय इन्फ्ल्युएन्सर्स खाद्यपदार्थांचे व्हिडिओ पोस्ट करतात त्याचप्रमाणे भारतात राहणारे किंवा भटकंतीसाठी आलेले अनेक इन्फ्ल्युएन्सर्स भारतीय खाद्यपदार्थांचा आस्वाद घेताना दिसतात.
अशा पद्धतीने सांस्कृतिक देवाणघेवाण करणारा आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये एका भारतीय व्यक्तीने आपल्या कोरियन कुटुंबासह पुरी भाजी खातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. पहिल्यांदा पुरी भाजी खाल्यानंतर कोरियन महिलेने जी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती पाहण्यासाठी नेटकरी उत्सूक आहे. हा व्हिडिओ व्हायरल होत असून जागतिक पातळीवर भारतीय खाद्यसंस्कृतीसाठी असलेले आकर्षण दर्शवत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कोरिअन तरुणीला आवडली भारतीय पुरी भाजी

व्हिडिओमध्ये दिसते की, भारतीय तरुण एका ताटात गरमा गरम पुरी घेऊन येतो आणि एका वाडग्यात वाटाना बटाट्याची भाजी सुकी भाजी आणि रस्सा भाजी घेऊ येतो. पुरी पाहून भारतीय तरुणाची कोरियन मेव्हणी खूप उत्सुक होते. ती त्याला प्रत्येक पदार्थाचे नाव विचार आणि त्याचा उच्चार करण्याचा प्रयत्न करते. हे खूप छान आणि स्वादिष्ट दिसत आहे असेही ती म्हणते. त्यानंतर आश्चर्यचकित होऊन ती विचारते, ‘मी हे कसे खाऊ?’ त्यानंतर भारतीय तरुण तिला पुरी भाजी कशी खायची हे सांगतो. पुरी भाजीचा एक घास खाल्यानंतर ती हसते आणि म्हणते, हे खूप चवदार आहे. हा हृदयस्पर्शी व्हिडिओ एका मजेदार ट्विस्टने संपतो.

जरी ती सुरुवातीला पाच पुऱ्या खात असली तरी पुन्हा किमची(कोरिअन पद्धतीचे कोबीचे लोणचे) आणि भात खाण्यासाठी मागते, ज्यावरून तिची सांस्कृतिक आवड दिसून येते. हा व्हिडिओ २५ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळवून ऑनलाइन लोकप्रियता मिळवली.

हेही वाचा – “सर्वात अवघड गोष्ट म्हणजे…” स्विगी डिलिव्हरी गर्लने नोकरीबाबत केला खुलासा, पाहा Video Viral

u

लोकांनी मजेशीर कमेंट्स केल्या


व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये खाद्यप्रेमींच्या प्रतिक्रिया येत आहेत. एका वापरकर्त्याने म्हटले, ‘भारतीय अन्न म्हणजे स्वर्गीय अन्न.’ तर दुसरा गंमतीने म्हणाला, किमची आणि पुरीची चव कशी असेल? याची मला उत्सूकता आहे. कोरियन महिला ज्या पद्धतीने पुरी बोलते त्याने अनेकांचे लक्ष वेधले. याबाबत एकाने कमेटमध्ये लिहिले की, “मला तिची पुरी म्हणण्याची पद्धत आवडली.”

हेही वाचा –“हॉर्नचा वापर कमी करा, इथे कोणी….” सतत हॉर्न वाजवणाऱ्यांवर वैतागले रिक्षावाले काका! रिक्षामागे लावली पुणेरी पाटी, Video Viral

सांस्कृतिक फरक ओळखून, एका वापरकर्त्याने कमेंट केली, ‘कोरियन लोक भात आणि किमचीशिवाय राहू शकत नाहीत.’ दुसऱ्या वापरकर्त्याने लिहिले, ‘किमची ही कोरियन लोकांसाठी एक भावना आहे, जसे आपल्याकडे डाळ-भात. आणखी एकाने लिहिले की, भारती खाद्यपदार्थ पृथ्वीवरील सर्वात स्वादिष्ट तेव्हाच असते जेव्हा ते स्वच्छ असते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Korean girl ate pureed vegetables for the first time what happened next watch in viral video snk