Shocking video: सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ पाहायला मिळतात. जे सतत व्हायरल होत असतात. त्यातील काही व्हिडिओ चांगले आहेत तर काही खूप वाईट आहेत. आजकाल कोणी काहीही केले तरी लोक त्याचा व्हिडिओ लगेच सोशल मीडियावर टाकतात. त्यातील काही व्हिडिओ काही वेळातच व्हायरल होतात. असाच एक धक्कादायक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. दक्षिण कोरियाच्या एक महिला युट्यूबरसह मुंबईतील रस्त्यांवर एक अत्यंत लज्जास्पद प्रकार घडल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. युट्यूबर लाइव्ह स्ट्रीमिंग करत असतानाच दोन तरुणांनी तिची छेड काढली. इतकेच नव्हे तर यातील एकाने त्या तरुणीचा चेहरा हाताने पकडून तिला किसही केलं. हा धक्कादायक प्रकार कॅमेरात कैद झाला असून व्हिडीओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल.

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दक्षिण कोरियातील एक महिला यूट्यूबर मोबाईवर लाइव्ह स्ट्रीमिंग करताना दिसतं आहे. त्याचवेळी दोन तरुण तिच्याजवळ येत तिच्याशी जबरदस्ती जवळीक साधण्याचा प्रयत्न करताना दिसतं आहेत. धक्कादायक बाब म्हणजे युट्यूबर महिला विरोध करत असताना आरोपी तिचा चेहरा बळजबरीने स्वत:कडे ओढत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहे. महिलेला हे दोन तरुण तिच्याशी काही गैरकृत्य करत असल्याचं लक्षात येताच तीने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती महिला तिचं लाइव्ह स्ट्रीमिंग करत पुढे निघून गेल्यानंतरही छेडछाड करणारे दोन्ही तरुण तिचा पाठलाग करत, तिची इच्छा नसताना तिला बळजबरीने तिला लिफ्ट द्यायचा प्रयत्न करत असल्याचंही व्हिडीओमध्ये दिसतं आहेत.

पाहा व्हिडीओ

हा सर्व प्रकार तिच्या एका फॉलोअरने मुंबई पोलिसांना मेंशन करुन संबंधित व्हिडीओ ट्विटरवर शेअर केला. त्यात लिहिलं आहे की, “पीडित तरुणी ही दक्षिण कोरियाची नागरिक आहे. खार परिसरात लाईव्हस्ट्रीमिंग करत असताना काही स्थानिक तरुणांनी तिच्यासोबत गैरवर्तन केलं.” दरम्यान संबंधित यूट्बूरने देखील या घटनेबाबत ट्वीट केलं आहे. तिने लिहिलं आहे की, काल रात्री लाईव्हस्ट्रीमिंगदरम्यान एका तरुणाने मला त्रास दिला. हे प्रकरण फार वाढू नये आणि तिथून निघून जाऊ यासाठी मी पुरेपूर प्रयत्न केला, कारण तो त्याच्या मित्रासोबत होता. पण काही लोकांनी म्हटलं की मी फारच फ्रेण्डली वागू लागल्यामुळे आणि बातचीत सुरु केल्यामुळे हा प्रकार घडला. या घटनेने मला स्ट्रीमिंगबाबत पुन्हा एकदा विचार करण्यासाठी भाग पाडलं आहे.