गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्या पतीसाठी कांदा भजी बनवणाऱ्या एका कोरियन महिलेचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. सध्या, किम नावाची ही महिला परत आली आहे आणि यावेळी ती आपल्या मुलाला हिंदी शिकवत आहे. हा व्हिडीओ किमने तिच्या इन्स्टाग्राम पेज प्रेम किम फॉरेव्हरवर पोस्ट केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ती भज्यांच्या ताटाकडे बोट दाखवत आपल्या मुलाला विचारताना दिसत आहे की ते काय आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ये पकोडा है’ असे ती लहान मुलाला शिकवताना ऐकू येते. त्यानंतर किम तिच्या मुलाला ‘पकौड़ा स्वाद है’ असे म्हणायला शिकवते आणि तिचा मुलगा तिचा मागून ते पुन्हा म्हणतो. लहान मूलही भजीसोबत खेळताना दिसत आहे. तिच्या इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करताना किमने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘कोरियन पत्नी मुलाला हिंदी शिकवते.’ व्हिडीओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि २१ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत.

CCTV : ‘काळ आला होता पण वेळ आली नव्हती’, अपघाताचा Viral Video पाहून तुमच्याही काळजात होईल धस्स…

लोकांना व्हिडीओ खूप आवडला आणि या व्हिडीओवर अनेक कमेंट्स केल्या आहेत. एका यूजरने कमेंट केली की, ‘तुम्ही तुमच्या मुलाला हिंदी शिकवताना पाहून खूप आनंद झाला, कारण आपल्याच देशातील लोक त्यांच्या भाषेपासून दूर जात आहेत.’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘खूप गोंडस’

गेल्या आठवड्यात एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात एक कोरियन महिला तिच्या भारतीय पती आणि मुलासाठी कांदा आणि बटाटा भजी बनवत होती. क्लिपमध्ये, किम कांद्याच्या भजीसाठी पीठ तयार करताना आणि तेलात बेसनचे छोटे गोळे टाकताना दिसत आहे. व्हिडीओमध्ये किम तिच्या भारतीय पती आणि मुलासाठी भजी बनवताना दिसत आहे आणि ते अगदी स्वादिष्ट दिसते. यूट्यूबवरील १० मिनिटांच्या व्हिडीओमध्ये, किम संपूर्ण सामग्रीसह भजी बनवते. तिच्या नवऱ्यानेही तिला भजी बनवण्यात मदत केली आणि तिने त्यासोबत चहा बनवला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Korean woman teaching her son hindi language you will also feel proud after watching viral video pvp