२६ ऑगस्ट रोजी देशभरात भगवान कृष्णजन्माष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली.परंपरेनुसार, रात्री १२ वाजता श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. लाडक्या कृष्णासाठी दह्याचा नैवेद्य दाखवण्यात आला. कृष्ण जन्माष्टमीच्या दुसर्‍या दिवशी गोपाळकाला देखील जल्लोषात साजरा करण्यात आला. कृष्णजन्माष्टमीदुसऱ्या दिवशी म्हणजेत गोपाळकालानिमित्त गोंविद एकत्र येऊन मानवी मनोरा उभारून उंच उंच दहीहंडी फोडतात. मुंबई पुण्यामध्ये सर्वात उंच दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धा आयोजित केल्या होत्या. चौका-चौकामध्ये दहीहंडी पाहण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. सोशल मीडियावर दहीहंडी पथकांचे अनेक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान सध्या एका आगळ्या वेगळ्या दहीहंडीची चर्चा होत आहे, कारण ही दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा एकमेकांच्या खांद्यावर उभे राहून, एकावर एक थर रचून मानवी मनोरे उभारले जात नाही. या गावात दहीहंडी फोडण्याची पद्धत वेगळी आहे. चला तर मग जाणून घेऊ या सविस्तर

उडी मारून डोक्याने फोडतात दहीहंडी

हा व्हायरल व्हिडिओ नवी मुंबईतील नेरूळ येथील शिरवणे गावामधील आहे. शिरवणे गावात वेगळ्या पद्धतीने दहंहडी उत्सव साजरा केला जातो. येथे उडी मारून दहीहंडी फोडली जाते. गेल्या ११० वर्षांपासून ही परंपरा जपली जात आहे. शिरवणे गावात टाळ मृदंगाच्या तालावर ही दहीहंडी तरुण चक्क आपल्या डोक्याने फोडतात. व्हायरल व्हिडीओमध्ये पाहू शकता की, दहीहंडी उत्सवात अनेक लोक सहभाी दहीहंडी डोक्याने फोडता येईल अशा उंचीवर बांधलेली दिसत आहे. दहीहंडी फोडण्याकरिता पळत येण्यासाठी तरुणांना जागा ठेवली आहे. दहीहंडी फोडण्याच्या स्पर्धेत सहभागी गोविंदा पळत येऊन उडी मारत आहे आणि दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. शेवटी एका गोविंदाला दहीहंडी फोडण्यात यश येते. दहीहंडी फोडताच सर्वजण आनंदाने त्याला उचलून घेताता. हा सोहळ्याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसत आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
What Sarangi Mahajan Said?
Sarangi Mahajan : “प्रवीण महाजन यांना गोपीनाथ मुंडेंनी पिस्तुल घेऊन दिलं होतं, पूनमला..”, सारंगी महाजन यांचा दावा
Khed Parshuram Ghat accident, Khed Parshuram Ghat,
खेड परशुराम घाटात दाट धुक्यामुळे चार वाहनांचा विचित्र अपघात; वाहनांचे मोठे नुकसान तर जीवितहानी टळली
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
Sudhakar khade murder
सांगली: भाजपचे पदाधिकारी सुधाकर खाडे यांचा जमिनीच्या वादातून खून
Vishwajeet Kadam jayshri patil
Vishwajeet Kadam: जयश्री पाटील यांना बंडखोरीस भाग पाडले – विश्वजित कदम

हेही वाचा – “एक होता डोंगर….!” विद्यार्थ्यांना नाचत-गात बडबडगीत शिकवणाऱ्या शिक्षकाचा Video चर्चेत; बालपणीचे दिवस आठवतील

हेही वाचा – तीन थरांचा मानवी मनोरा रचून गोविंदांनी सादर केला अफझल खानाच्या वधाचा प्रसंग, Video Viral पाहून अंगावर येईल काटा

मुंबईतील या गावात जपली जाते ११० वर्ष जुनी परंपरा

व्हिडिओ knowledge_marathi नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की,” नवी मुंबईतदेखील शिरवणे गावात दहीहंडीची ११० वर्षांची परंपरा जपली जात आहे. एकीकडे उत्सवात लावण्या, डीजे यांचा धांगड धिंगाणा सुरू असताना, शिरवणे मात्र टाळ मृदंगाच्या तालावर ही हंडी चक्क तरुणांनी डोक्याने फोडायची असते.”

व्हिडीओवर कमेट करून अनेकांनी या आगळ्या वेगळ्या पंरपरेबाबत आश्चर्य व्यक्त केले.