गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या २४ वर्षीय क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने गुरुवारी (२ जून २०२२ रोजी) जाहीर केलं की ती या महिन्यात स्वत:शीच लग्न करणार आहे. हे लग्न म्हणजे स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देण्याचं प्रतिक असेल, असंही तिने सांगितलं. यापूर्वी काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांच्यानंतर आता वडोदराच्या माजी उपमहापौर आणि भाजपा नेत्या सुनीता शुक्ला यांनीही यावर आक्षेप घेतला आहे. हिंदुत्व याची परवानगी देत नाही, असे शुक्ला म्हणाल्या. अशा प्रकारामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल, असंही त्या म्हणाल्या.

२४ वर्षीय क्षमा बिंदूने ११ जून रोजी वडोदरा येथील हरिहरेश्वर मंदिरात स्वतःशी लग्न करणार असल्याची घोषणा केली आहे. याला विरोध करताना सुनीता शुक्ला यांनी हे सिंगल मॅरेज कॅनेडियन वेब सिरीज ‘एनी विथ ई’ वरून प्रेरित असल्याचं म्हटलं आहे. शुक्ला म्हणाल्या की, एकपत्नीक विवाह हिंदू धर्माच्या विरोधात असून त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल. मंदिरात अशा लग्नाला माझा विरोध आहे. तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही.

(हे ही वाचा: “माझ्या घरात पैसे…” खासदार असूनही IPL मध्ये का काम करतो? या प्रश्नावर गौतम गंभीर संतापला)

(हे ही वाचा: मुलीने हार घालण्यास नकार दिल्याने वराला आला राग आणि… ; बघा Viral Video)

भाजपा नेत्यापूर्वी, महाराष्ट्र काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी एकल लग्न किंवा स्व-विवाह हा वेडेपणा असल्याचं म्हटलं होतं. देवरा म्हणाले, “आशा आहे की हा वेडेपणा भारतापासून दूर राहील.” त्यांच्या या वक्तव्यावर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. तर भाजपाच्या सुनीता शुक्ला ट्विट करून म्हणाल्या, “मी मंदिरातील एकल विवाहाविरोधात आहे. तिला कोणत्याही मंदिरात लग्न करू दिले जाणार नाही. असे विवाह हिंदू धर्माच्या विरोधात आहेत. त्यामुळे हिंदूंची लोकसंख्या कमी होईल.”

(हे ही वाचा: Viral: व्यक्ती गाढ झोपेत असताना अंगावर चढले दोन मोठे अजगर; व्हिडीओ पाहून नेटकरी झाले थक्क)

एका खासगी कंपनीत काम करणारी क्षमा बिंदू ११ जूनला लग्न करणार आहे. ती तिच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राशी झालेल्या मुलाखतीत क्षमा बिंदूने तिच्या अविवाहित लग्नाचा निर्णय, तिची हनिमूनची तयारी या सर्व गोष्टींबद्दल सांगितले. अग्नीला साक्षी ठेवून ती सात फेरे घेईल आणि स्वतः कुंकू भरेल. स्वतःशी लग्न करायची ही देशातील पहिलीच घटना असावी, असं म्हटलं जातंय.

Story img Loader