स्वतःशीच लग्न करणाऱ्या गुजरातच्या क्षमा बिंदू या मुलीने नुकताच आपला पहिला करवा चौथ साजरा केला. तिच्या या करवा चौथ सेलिब्रेशनमुळे ती सध्या चर्चेत आहे. क्षमाने यासंबंधीची पोस्ट आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर केली आहे. यामध्ये तिने लाल रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. क्षमा आपल्या आयुष्याशी निगडित अनेक फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करत असते. पण सध्या तिने करवा चौथसाठी जे कॅप्शन लिहिलंय त्याने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलंय.

क्षमाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये ती नव्या नवरीप्रमाणे नटलेली दिसतेय. तिने स्वतःला आरशात पाहून करवा चौथचा व्रत सोडला. यावेळी तिने आरशाच्या मदतीने स्वतःला चाळणीतून पाहिले आणि स्वतःला घास भारावला. तिने आपल्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये म्हटलंय, “आज मी पहिला करवा चौथ साजरा केला. जेव्हा मी स्वतःला आरश्यातून पाहिले, तेव्हा मला माझा हरवलेला अभिमान दिसला. करवा चौथच्या शुभेच्छा”

actor arun singh rana divorce
“मी खचलो होतो”, प्रसिद्ध अभिनेत्याने केली घटस्फोटाची घोषणा; अतुल सुभाषशी स्वतःची तुलना करत म्हणाला, “माझ्या आयुष्यातील…”
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
mantra of happy married life
Video : नात्यांमध्ये इगो बाजूला ठेवा, काका काकूंनी सांगितला सुखी संसाराचा मंत्र, व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “ही अरेंज मॅरेजमधील सुंदरता आहे..”
Suresh Dhas
Suresh Dhas : …अन् भरसभेत सुरेश धसांनी आकाचा फोटोच दाखवला; म्हणाले…
success story of Nitin seth who once borrowed 5 rs lakh from friends now owns crores company know his business success story of Nitin seth who once borrowed 5 rs lakh from friends now owns crores company know his business
एकेकाळी मित्रांकडून घेतली होती लाखोंची उधारी, आता उभारलीय १००० कोटींहून अधिकची कंपनी, वाचा नेमका कोणता व्यवसाय करते ‘ही’ व्यक्ती
Bride grand Welcome To The Chawla with Band
‘हा आनंद केवळ चाळीतच…’ नव्या सुनेचं असं स्वागत कधी पाहिलं नसेल; Viral Video पाहून आठवतील जुने दिवस
timepass movie director ravi Jadhav bought new house watch video
Video: ‘टाइमपास’ दिग्दर्शक रवी जाधव यांनी घेतलं नवं आलिशान घर, वास्तुशांतीचे खास क्षण शेअर करत म्हणाले, “गावातील छोट्याशा घरातून…”
Abhidnya bhave Anniversary Post
“My सर्वस्व मेहुल पै…”, लग्नाच्या वाढदिवशी अभिज्ञा भावेची पतीसाठी रोमँटिक पोस्ट; मराठी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव

Viral Video : वडिलांना Swiggy मध्ये नोकरी लागल्यावर मुलीचा आनंद गगनात मावेना; केलं असं काही की…

९ जूनला क्षमाने स्वतःशीच लग्न केलं. राहत्या घरामध्ये मोजक्या मित्रपरिवाराच्या उपस्थितीत हा अनोखा लग्नसोहळा पार पडला. यावेळी तिने स्वतःच्या भांगेत कुंकू भरले आणि स्वतःलाच मंगळसूत्रही घातले. लग्नाच्या आधी तिने हळद, मेहंदी अशा विधीही पूर्ण केल्या. त्यावेळी क्षमाचे फोटो आणि व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते.

Viral Video: जिराफच्या पिल्लावर सिंहिणीचा अचानक हल्ला; आईने जीवाची पर्वा न करता केला जबरदस्त पलटवार!

खरंतर क्षमा ११ जूनला स्वतःशी लग्न करणार होती. मात्र, आपल्या लग्नात कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी तिने ९ जूनलाच आपल्या घरातच गुपचूप लग्न उरकले. क्षमा स्वतःशी लग्न करून खूपच खुश आहे. तथापि, तिला यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागली आहे. अनेकांनी तिला यावरून ट्रोलही केले. क्षमानेही आरशासमोर स्वतःचे चुंबन घेतानाचा फोटो शेअर करून स्वतःवरील प्रेम व्यक्त केले होते.

Story img Loader