Kuldeep Yadav With Bageshwar Baba: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात पाकिस्तानी संघासमोर मोठा अडथळा ठरलेल्या कुलदीप यादवचा एका नवा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आपल्या विधानांवरून नेहमीच चर्चेत असणार बागेश्वर धामचे बाबा म्हणजेच धीरेंद्र शास्त्री यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हे काही फोटो शेअर करण्यात आले आहेत. पाकिस्तान व श्रीलंकेसमोर दमदार गोलंदाजी करणारा कुलदीप यादव हा धीरेंद्र शास्त्रीच्या दर्शनासाठी गेल्याची चर्चा या फोटोंवरून रंग आहेत. आशिया कपमध्ये कुलदीपचा जबरदस्त खेळ हा बाबांच्याच आशीर्वादाने दिसून येतोय असे दावे बाबांच्या भक्तांकडून करण्यात येत आहेत.

बागेश्वर बाबा हे नाव चर्चेत असण्याबरोबरच अनेकदा वादातही आले आहे. पण तरीही अनेक सेलिब्रिटी बागेश्वर बाबांच्या दरबारात हजेरी लावताना पाहायला मिळाले आहेत. फक्त कुलदीप यादवच नव्हे तर युजवेंद्र चहलने सुद्धा बाबांचे दर्शन घेतले आहे. या भेटीच्या काहीच दिवसांनी आशिया कप स्पर्धा सुरू झाली. आशिया कपमध्ये चहलची निवड झाली नसली तरी कुलदीपला यंदा मोठी व महत्त्वाची संधी मिळाली आहे.

Karun Nair Smashed 88 Runs Against Maharashtra in Semi Final Vijay Hazare Trophy Innings
Karun Nair: करूण नायरचं विजय हजारे ट्रॉफीमधील वादळ कायम, सेमीफायनलमध्ये महाराष्ट्राच्या गोलंदाजांना दिवसा दाखवले तारे
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
two wheeler rider senior citizen injured due to Manja
पुणे : जीवघेण्या नायलाॅन मांजामुळे ज्येष्ठ नागरिकांसह तिघे जखमी
PV Sindhu gets emotional seeing Vinod Kambli's video
PV Sindhu: विनोद कांबळीचा ‘तो’ व्हिडीओ पाहून पीव्ही सिंधू झाली भावनिक; पैसे, चांगली माणसं याबाबत केलं मोठं विधान
Fan who caught Kane Williamson's sixer with one hand wins Rs 90 lakh prize in SA20 2025 Match
SA20 2025 : मॅच पाहायला गेला आणि लखपती झाला, केन विल्यमसनच्या षटकाराने चाहत्याचं नशीब कसं बदललं?
robbery at Mayank Jewellers in Vasai Jeweller owner injured
वसईतील मयंक ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा; सराफ मालक जखमी, लाखोंची लूट
explosion occurred in Shankeshwarnagar Nalasopara East
नालासोपाऱ्यात परफ्यूमवरील तारखा बदलताना स्फोट, चार जण जखमी

तुम्ही भारत विरुद्ध पाकिस्तानचा आशिया चषक २०२३ मधील सुपर ४ टप्यातील बहुचर्चित सामना पाहिला असेल तर कुलदीप यादवची कमाल तर वेगळी सांगायलाच नको. पाकिस्तानच्या फलंदाजांचा अक्षरशः धुव्वा उडवत कुलदीपने पाच विकेट घेतल्या होत्या. तर अवघ्या २४ तासांच्या अंतराने पुन्हा भारत विरुद्ध श्रीलंका सामन्यात खेळताना त्याने चार विकेट्स घेतल्या. कुलदीपच्या या जबरदस्त सादरीकरणानंतर त्याचे बागेश्वर बाबांच्या पायाशी बसून काढलेले फोटो व्हायरल होत आहेत.

हे ही वाचा<< आशिया चषकाच्या फायनलमध्ये पुन्हा IND vs PAK? श्रीलंका पॉईंट टेबलमध्ये पुढे पण..अशी आहेत गणितं

दरम्यान, काहींनी या फोटोवरून टीका सुद्धा केल्या आहेत. जो खेळाडू रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून मेहनत करून खेळतो त्याला कोणा बाबाच्या आशीर्वादाची काही गरजच नाही असेही काहींचे म्हणणे आहे. तो दर्शनासाठी गेला ही त्याची श्रद्धा किंवा निवड आहे पण त्याचे श्रेय बाबांना देणं हे खूप चुकीचं आहे असंही काहीजण म्हणत आहेत. तुम्हाला यापैकी कोणाचं मत पटतंय कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader