Kulhad Pizza Couple Viral Video: सोशल मीडियावर कुल्हड पिझ्झा कपल या नावाने प्रसिद्ध झालेल्या सहज अरोरा आणि गुरप्रीत कौर यांच्या आयुष्यात मागच्यावर्षी एक भयानक प्रसंग घडला. खासगी क्षणांचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर हे दोघेही चर्चेत आले होते. पंजाबचे लोकप्रिय कुल्हड पिझ्झा कपल सेहज अरोरा आणि गुरप्रीत कौर नेहमीच नेटीझन्सचे लक्ष वेधून घेतात. दरम्यान त्यांचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत आला आहे. दरम्यान आतापर्यंतच्या नकारात्मक चर्चांमध्ये आता या कपलची सकारात्मक चर्चा सुरु आहे. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, नक्की झालं तरी काय. तर झालं असं की, या कुल्हड पिझ्झा कपलचा एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ..
पुन्हा एकदा चर्चेत का?
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, गायक तरण कपूरच्या ‘वे सोहनेया’ या पंजाबी हिट गाण्यावर नाचताना दिसत आहेत. कुल्हड पिझ्झा कपल एका नयनरम्य ठिकाणी असल्याचं दिसत आहे, यावेळी निसर्गरम्य वातावरणात हे दोघेही डान्स करताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशमधला हा परिसर असल्याचा अंदाज आहे. हे दोघेही रस्त्याच्या कडेल वेगवगेळ्या स्टेप्समध्ये डान्स करताना दिसत आहेत.
अगोदरच चर्चेत असलेल्या या कपलचा व्हिडिओ समोर येताच नेटीझन्सनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ sehaj_arora_ नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकरी वेगवेगळ्या सकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. नेटकऱ्यांनी नव्या आत्मविश्वासने त्यांनी नवा आणि चांगला व्हिडिओ शेअर केल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. एकानं म्हंटलं आहे की, “वाह खूप छान, नवी सुरुवात” तर आणखी काहींनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> Shocking video: एका प्रवाशासाठी अख्खी मुंबई लोकल रिकामी केली; मध्य रेल्वेत नेमकं काय घडलं?
कुल्हड पिझ्झा कपलचं स्पष्टीकरण
मागच्या वर्षी सप्टेंबर महिन्यात या जोडप्याला पहिलं मुल झालं. त्यानंतर काही दिवसांतच खासगी व्हिडीओ व्हायरल झाला होता. हा व्हिडीओ काही खंडणीखोरांनी तयार केला असून त्यांनी आमच्याकडून पैशांची मागणी केली आहे, त्यामुळे हा व्हिडीओ व्हायरल करणे थांबवा, अशी विनंती या जोडप्याने केली होती. सदर व्हिडीओ मॉर्फ असल्याचेही त्यांनी सांगितले होते. तसेच या व्हिडीओमुळे आमचे व्यवसाय वाढविण्याचे सर्व स्वप्न धुळीस मिळाले. त्यावेळी आम्ही देवाकडे फक्त हीच विनंती करत होतो की, ही वेळ पटकन निघून जाऊ दे.