Kumbh Mela 2025 Viral Girl Monalisa video : उत्तर प्रदेशमधील प्रयागराज येथे २०२५ चा महाकुंभ मेळा चालू आहे. दर १२ वर्षांनी होणारा हा कुंभमेळा जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. हा कुंभमेळा १३ जानेवारीपासून ते २६ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. दरम्यान, या महाकुंभ मेळ्यात माळा विकणारी सुंदर मुलगी समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या मुलीचं नाव मोनालिसा भोसले असं आहे. मोनालिसा मुळची मध्य प्रदेशमधील इंदूरची रहिवासी आहे. देखणं रुप आणि समाजमाध्यमांवर मिळत असलेल्या प्रसिद्धीमुळे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वचजण तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी गर्दी करत होते. मात्र,मोनालिसाला आता या लोकांचा त्रास होऊ लागला आहे. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिला इंदूरला पाठवलं आहे. महाकुंभ मेळ्यात माळांची विक्री होत नसून लोकांकडून मानसिक त्रास होत असल्याचं तिनं स्वतःच सांगितलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सुंदर डोळे आणि रेखीव चेहऱ्यामुळे मोनालिसाला प्रसिद्धी मिळाली असली तरी ही प्रसिद्धीच तिच्या पोटावर उठली आहे.
या प्रसिद्धीमुळे तिला महाकुंभ मेळा सोडून घरी जाणं भाग पडलं आहे. तसेच तिच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेसाठी तिला एका साधूच्या शिबिरात आश्रय घ्यावा लागला. माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या चार-पाच दिवसांपासून मोनालिसा घरातून बाहेर पडली की तिच्याबरोबर फोटो काढण्यासाठी लोक गर्दी करत आहेत. अनेकजण तिच्याशी जबरदस्ती बोलण्याचा, तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत आहेत. काही लोकांनी तिला महाकुंभ मेळ्यातून उचलून नेण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे तिच्या कुटुंबाला तिची काळजी वाटू लागली आहे. परिणामी तिला महाकुंभ मेळा सोडून जावं लागलं.

हे ही वाचा
Maha Kumbh Mela 2025: प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात व्हायरल झालेल्या मोनालिसाबद्दलच्या ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?

मोनालिसाला युट्युबर्सकडून मनस्ताप

कुंभ मेळ्यात अथवा घराच्या आसपास मोनालिसा दिसल्यावर अनेकजण तिच्याकडे सेल्फीची मागणी करताना दिसून येत होतं. दरम्यान, तिचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. महाकुंभमेळ्यात दर्शनासाठी आलेले भाविक रांगा लावून तिच्याबरोबर फोटो काढत होते. अनेक युट्यूबर्स, रीलस्टार तिच्याबरोबर व्हिडीओ चित्रीत करण्याची मागणी करताना दिसत आहेत. अनेकजण तिच्या परवानगीशिवाय तिचे व्हिडीओ चित्रित करत आहेत. तिला कुंभ मेळ्यात फिरणं देखील अवघड झालं होतं. शेवटी सुरक्षेसाठी तिला एका साधूच्या शिबिरात आश्रय घ्यावा लागला. गेल्या दोन दिवसांपासून तिला कुंभ मेळ्यात व घराच्या आसपास तोंडाला स्कार्फ बांधून फिरावं लागत होतं.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kumbh mela 2025 monalisa viral girl sent home by parents amidst fame life threat asc