अलाहाबादमध्ये ५ जानेवारीपासून कुंभमेळा सुरू होत असून आताच या महासोहळ्याचे पडघम वाजू लागले आहेत. प्रचंड भव्य अशा तात्पुरत्या वसाहतींसह सोयीसुविधा उभारल्या जात असून बॉलीवूडमधल्या चित्रपटाचा भव्य सेट उभारला जातो की काय असं वातावरण आहे. इथं गंगा नदीपासून अवघ्या १०० मीटरवर पन्नास एकरांमध्ये १००० भव्य लक्झरी व्हिलाजही उभारण्यात येत असून त्यांच्या उभारणीसाठी बॉलीवूडमधले आर्ट डायरेक्ट ज्यांनी संजय लीला भन्साळीसाठी काम केलं आहे असे अनंत बाबुराव शिंदे काम करत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार तीन प्रकारचे लक्झरी व्हिला किंवा तंबू याठिकाणी असून सगळ्यात महागडा तंबू ३५,००० रुपये प्रति रात्र या दराचा आहे. तर डिलक्स व लक्झरी अशा उर्वरीत प्रकारांसाठी प्रति रात्र अनुक्रमे १३,००० रुपये व १८,००० रुपये आकारण्यात येत आहेत. या एकूण व्हिलांपैकी ८० टक्के तंबू आधीच बुक झाल्याचे हितकरी प्रॉडक्शनच्या सत्येंद्र कुमार यांनी सांगितलं. प्रत्येक व्हिला ९०० चौरस फुटांचा असून दोन बेडरूम्सनी सज्ज आहे. तसेच टिव्ही, सोफा आदी सुविधाही देण्यात येणार आहे. लक्झरी व्हिला बुक करणाऱ्यांमध्ये ३० टक्के अनिवासी भारतीय आहेत.

इंद्रप्रस्थम असं या भागाचं नामकरण करण्यात आलं असून ४० दुकानं व चार रेस्टॉरंट्सही आहेत. बॉलीवूड, वैदिक, विविध राज्यातल्या लोककला अशा विविध थीम्स या रेस्टॉरंट्समध्ये रचण्यात आल्या आहेत. एकूणच कुंभमेळ्याला जाणाऱ्या श्रीमंत भाविकांना धार्मिक कार्य करून पुण्यही मिळावं व राहण्याचे खाण्यापिण्याचे हाल न होता लक्झरीही मिळावी असा हा एकूण प्रकार आहे. त्यामुळे ज्यांची खर्च करायची ऐपत आहे, त्यांच्या कुंभमेळ्याची वारी निव्वळ तीर्थस्थानाची भेट न ठरता, भौतिक स्वर्गसुख देणारी सहल ठरेल अशी शक्यता आहे.

याखेरीज अन्य ठिकाणीही भाविकांच्या राहण्याच्या सोयी करण्यात येत असून ८०० ते ९०० रुपयांपासून १० ते १२ हजार रुपये प्रति रात्र अशा दरानं तंबूंची सोय करण्यात येत आहे. गंगा, यमुना व लुप्त झालेल्या सरस्वती नदीच्या संगमावर कुंभमेळा भरतो व त्यासाठी तब्बल १३ ते १४ कोटी भाविक भेट देतात असा अंदाज आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबादचं नामकरण आता प्रयागराज होत असून राज्यात प्रचंड बहुमतानं भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे, त्यामुळे हिंदुंच्या मनात श्रद्धेचं स्थान असलेल्या या कुंभमेळ्याला यंदा विशेष महत्त्व असेल हे उघड आहे.