Viral Video at kumbhe waterfall : गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. सगळीकडे धबधबे, नाले आणि नद्या ओसंडून वाहत आहे. अशात धबधब्याच्या ठिकाणी जाताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे पण अनेक तरुण मंडळी जीवाची पर्वा न करता ओसंडून वाहणाऱ्या धबधब्याच्या ठिकाणी अन् उंच टेकडीच्या कडेला जाऊन फोटो, व्हिडीओ आणि रील्सच्या काढताना दिसतात पण असे करू नये. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये कुंभे धबधब्यावरील दृश्य दाखवले आहेत.

फोटो, रील काढण्यासाठी लोक जीवाशी खेळतात

या व्हायरल व्हिडीओमध्ये कुंभे धबधबा दाखवला आहे. व्हिडीओ काढणारा तरुण धबधब्याच्या शेजारी जाऊन फोटो काढणाऱ्या तरुणाकडे बोट दाखवून म्हणतो, “ही रिस्क आहे. एवढं खाली जाणे, बरं नाही म्हणून जीवाशी खेळू नये.” त्यानंतर तो एका उंच टेकडीच्या टोकावर बसलेल्या एका तरुणाला आवाज देतो आणि म्हणतो, “मित्रा, एवढं नको जाऊ. रिस्क आहे रे. खूप खोल आहे बरं का. एवढी रिस्क नाही घ्यायची. पाय घसरला तर डायरेक्ट खाली जाणार.” त्यानंतर हा व्हिडीओ काढणारा तरुण असे दोन तीन दृश्य दाखवतो आणि शेवटी म्हणतो, “सर्वांना कळकळीची विनंती आहे. तुम्ही जीवाची रिस्क अजिबात घेऊ नका. मी पण खाली जाणार नाही. कारण खरंच ही रिस्क आहे. गंभीरपणा थोडा राहू द्या. सर्वांना विनंती करेल जे फिरायला येतात. उगाच मस्ती करू नका आणि जीवाशी खेळू नका. स्वत:च्याही आणि दुसऱ्याच्याही.”

man steals jewellery and mother-in-law sells it both arrested
पिंपरी : जावई चोरायचा दागिने आणि सासू करायची विक्री; ‘असे’ फुटले बिंग
Ramdas Kadam On Uddhav Thackeray
Ramdas Kadam : “उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं दोन तासांत आमदार परत आणतो; पण…”, शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याचं मोठं विधान
Leopard funny video
‘भूक कंट्रोल करता आली पाहिजे…’ तळ्यात मासा सापडला समजून बिबट्याने स्वतःची शेपूट पकडली अन् पुढे जे घडलं… VIDEO पाहून हसाल पोट धरून
Liquor bottles, Dombivli East Railway Station,
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकाच्या प्रवेशव्दारावर दारूच्या बाटल्यांचा खच, प्लास्टिक पिशव्या, दुर्गंधीने पादचारी हैराण
pain relief, dry needling, physiotherapy, exercise, lifestyle changes, neck pain, chronic pain, pain management, posture improvement, patient education,
Health Special: जो दुसऱ्यावरी विसंबला..
tiger viral video loksatta
Video: हक्काच्या घरासाठी वाघाचे ‘चिपको’ आंदोलन…व्हिडीओ एकदा बघाच…
india s First Female F1 Racer salva marjan marathi news
साल्वा मार्जन… भारतातली पहिली एफ-१ रेसर
Two lions trying to attack a dog running with the speed
थरारक! वाऱ्याच्या वेगाने धावून दोन सिंहांचा श्वानावर हल्ला करण्याचा प्रयत्न; पुढे असं काही घडलं…, VIDEO पाहून अंगावर येईल काटा

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : Pakistan Woman Social Post: “पाकिस्तानमध्ये मुलगी म्हणून जगणं फार कठीण”, तरुणीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल; सांगितला धक्कादायक अनुभव!

girishpatankarvlogs या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” कुंभे धबधबा, मृत्यूचा सापळा का बनत चालला आहे?
हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा सगळ्यांच्या फायद्यासाठी…
जेव्हा मी शूटला गेलो तेव्हा पाहिले की बरेच लोक विनाकारण कोणत्याही सुरक्षेशिवाय धबधब्याचा कडेला जाऊन फोटो, रील काढण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना सांगून सुद्धा ऐकत नव्हते,
बरेच लोक एका कड्यावर जाण्याचा प्रयत्न करत होते. जिथे कधीही पाय घसरून मृत्यू होऊ शकतो, सगळे जण आपला जीव धोक्यात घालून हे साहस करायला जात होते कोणतीही माहिती नसताना…
का? कशासाठी? जिवंत राहाल तर अजून फोटो, रील बनवाल हे कोण सांगेल यांना, आम्ही सांगून थकलो त्या वेळी, आणि शेवटी एक जीव गेलाच.
जर तुम्हाला साहस करायचे असेल तर बरेच certified ग्रुप आहेत त्यांच्याबरोबर जा संपूर्ण सुरक्षेने, तुम्हाला आनंद पण मिळेल आणि तुम्ही सुरक्षित सुद्धा रहाल.”

या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “दादा अजून एक दोन जण गेल्याशिवाय कळणार नाही त्यांना सह्याद्री दिसायला जितका सुंदर आहे तितका रौद्र देखील आहे” तर एका युजरने लिहिलेय, “म्हणून जुने माणसं बोलायची दुरून डोंगर साजरे, निसर्ग लांबूनच छान दिसतो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “निसर्गाचा आनंद घ्यायचा सोडून काय असले प्रकार चालू आहेत? का लोकांना समजत नाही?” अनेक युजर्सनी हा व्हिडीओ पाहून संताप व्यक्त केला आहे.