Kuwait Store Sells ‘Trendy Slippers’ For Rs 1 Lakh Video Viral : तुमच्यापैकी अनेकांनी लहानपणी निळ्या आणि पांढऱ्या रंगाची रबराची स्लीपर वापरली असेल. आजही अनेक जण ही स्लीपर वापरतात. विशेषत: आपल्या देशात टॉयलेटला जाण्यासाठी म्हणून या स्लीपरचा वापर करतात; जी अगदी १०० रुपयांपासून ५०० ते १००० रुपयांपर्यंत मिळते. पण तुम्ही कधी ऐकले आहे का की, एका स्लीपरची किंमत लाखात आहे? होय, तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल; पण सध्या अशीच एक स्लीपर सध्या चर्चेत आहे. या स्लीपरची किंमत समजल्यावर तुमच्याप्रमाणेच अनेकांना धक्काच बसला आहे. विशेष म्हणजे ही चप्पल भारतात नाही, तर कुवेतमध्ये विकली जात आहे.
सौदी अरेबियातील कुवेतमधील एका दुकानात ही स्लीपर ४,५०० रियालमध्ये विकली जात आहे, ज्याची भारतीय रुपयांमधील किंमत एक लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. या स्लीपरला ट्रेंडी सँडल, असे नाव देण्यात आले आहे. या चप्पलच्या किमतीने भारतीय लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर बरेच जण त्याच्या जास्त किमतीवरून जोरदार टीका करीत आहेत. लोक म्हणतायत की, या नेमक्या त्याच स्लीपर आहेत, ज्या सहसा टॉयलेटला जाताना वापरल्या जातात. या व्हिडीओत स्टोअरमधील एक कर्मचारी त्या स्लीपरची वैशिष्ट्ये आणि किंमत स्पष्ट करताना दिसत आहे. (Kuwait Store Sells Trendy Slippers)
More Stories On Viral Video : शत्रूलाही येऊ नये असा मृत्यू! लोखंडी शिडी खेचत असताना बसला विजेचा धक्का, छतावरुन धाडकन कोसळला अन्…
हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील kuwaitinside नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. त्यावर अनेकांनी वेगवेगळ्या प्रकारच्य कमेंट्स केल्या आहेत. विशेषत: भारतीयांनी या व्हिडीओवर अगदी हटके कमेंट्स केल्या आहेत.
“भारतात आम्ही या स्लीपर बाथरूममध्ये जाताना घालतो” युजर्सच्या कमेंट्स (Slipper Price In Kuwait)
काही युजर्सनी लिहिले, “म्हणजे आम्ही आयुष्यभर टॉयलेटला जाताा ४,५०० रियाल म्हणजेच एक लाख रुपयांची चप्पल वापरत आलो आहोत.” बरेच लोक या स्लीपरबाबत म्हणाले, “भारतात आम्ही या स्लीपर बाथरूममध्ये जाताना घालतो आणि ती आम्ही ६० रुपयांना विकत घेतो.” एका युजरने असेही म्हटले, “मुलांना शिस्त लावण्यासाठी हे भारतीय मातांचे आवडते शस्त्र आहे.” दुसऱ्या युजरने लिहिले, “हे खरोखरच सर्वोत्तम मदर्स डे गिफ्ट आहे. ते सर्व मातांसाठी सर्वोत्तम शस्त्र आहे. माझ्या आईची चप्पल माझ्यासाठी सर्वोत्तम होती.”